आता Aadhaar प्रमाणे Voter ID सुद्धा डिजीटल; सोबत ठेवण्याचं टेन्शन संपणार

तुम्ही आता डिजीटल स्वरुपात मतदार ओळखपत्राचा (Digital Voter ID) वापर करु शकाल. कारण तुमचं मतदार ओळखपत्र आता आधार कार्डप्रमाणे डिजीटल होऊ शकतं.

आता Aadhaar प्रमाणे Voter ID सुद्धा डिजीटल; सोबत ठेवण्याचं टेन्शन संपणार
voter
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 4:43 PM

नवी दिल्ली : मतदान करायला जाताना तुम्ही मतदार ओळखपत्र (Voter ID) सोबत नेता. परंतु आता तुम्ही डिजीटल स्वरुपात मतदार ओळखपत्राचा (Digital Voter ID) वापर करु शकाल. कारण तुमचं मतदार ओळखपत्र आता आधार कार्डप्रमाणे डिजीटल होऊ शकतं. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार निवडणूक आयोग (Election Commission) लवकरच मतदार ओळखपत्र हे डिजीटल स्वरुपात (Digital Voter Cards) घेऊन येण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे Voting Card आता आधार कार्डप्रमाणे डिजीटल स्वरुपात जवळ ठेवता येणार आहे. (EPIC : Voter ID cards may go digital before 5 states elections in 2020; Election Commission latest updates)

सध्याच्या Voting Card धारकांना हेल्पलाईन अ‍ॅपच्या माध्यमातून केवायसी (KYC) केल्यानंतर ही सुविधा उपलब्ध होऊ शकते. मतदारांना ‘इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी कार्ड’ (EPIC) ही सुविधा सहज उपलब्ध करून देणे हा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून निवडणूक आयोगाने हे पाऊल उचललं आहे. दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी ही सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ही सेवा सुरु केल्यानंतर मतदार त्यांचं वोटिंग कार्ड डाऊनलोड करुन वापरु शकतील.

नव्या मतदारांना थेट डिजीटल वोटिंग कार्ड मिळण्याची शक्यता

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, वोटिंग कार्डबाबतची नवी सुविधा लागू झाल्यानंतर जे नवे मतदार नोंदणी करतील, त्यांना थेट डिजीटल वोटर आयडी दिला जाईल. नव्या मतदारांना ही सुविधा आपोआप मिळेल. मात्र सध्याच्या मतदारांना हेल्पलाईन अॅपद्वारे काही औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच डिजीटल ओळखपत्र मिळेल. नवीन मतदार इंटरनेटवरून त्यांच वोटिंग कार्ड डाऊनलोड करू शकतील आणि त्या डिजीटल कार्डच्या माध्यमातून ते त्यांचा मतदानाचा हक्क बजावू शकतील. या नव्या प्रणालीमुळे मतदान ओळखपत्र मिळण्यासाठी लागणारा वेळ आणि नागरिकांना होणारा त्रास कमी होणार आहे.

डिजीटल मतदार कार्डमध्ये दोन क्यूआर कोड

ईपीआयसीच्या (EPIC) डिजीटल मतदार कार्डमध्ये दोन क्यूआर कोड (QR) असतील. या कोडमधील माहितीच्या आधारे, इंटरनेटवरून डाऊनलोड केलेल्या मतदान कार्डद्वारे मतदार मतदान करू शकतील. यामधील क्यूआर कोडमध्ये मतदाराचे नाव, त्याच्या वडिलांचे नाव, वय, लिंग आणि मतदारांच्या फोटोशी संबंधित माहिती असणार आहे. तर दुसर्‍या क्यूआर कोडमध्ये मतदार यादीतील अनुक्रमांक, मतदाराचा पत्ता आणि इतर माहिती असेल.

संबंधित बातम्या 

रंगीत व्होटर आयडी हवंय? मग ऑनलाईन अप्लाय करा! जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

आधार कार्डला पॅन लिंक केलात का? नाहीतर द्यावा लागेल 10 हजाराचा दंड, डेडलाईन संपतेय!

Aadhaar Card | ‘आधार’शी नेमका कोणता मोबाईल क्रमांक जोडलाय? केवळ 5 मिनिटांत मिळेल उत्तर!

(EPIC : Voter ID cards may go digital before 5 states elections in 2020; Election Commission latest updates)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.