लोकसभेच्या तोंडावर योजनांचा पाऊस! 10 वर्षांतील कामांची यादीच वाचली, काँग्रेसवर असा साधला निशाणा पंतप्रधानांनी
PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अहमदाबाद येथून 10 नवीन वंदे भारत ट्रेन आणि इतर ट्रेन सेवांना हिरवा झेंडा दाखवला. त्यवेळी हा तर केवळ ट्रेलर आहे, येत्या पाच वर्षांत भारतीय रेल्वेचा कायापालट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर पण निशाणा साधला.
नवी दिल्ली | 12 March 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी रेल्वे योजनांचा पिटारा उघडला. त्यांनी मंगळवारी अहमदाबाद येथून ऑनलाईन 10 वंदे भारत ट्रेन आणि इतर रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवला. रेल्वेचा कायापालट आणि विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकतांमधील एक असल्याचे ते म्हणाले. येत्या पाच वर्षांत भारतीय रेल्वेचा कायापालट करण्याची गॅरंटी त्यांनी दिली. या 10 वर्षांतील काम तर केवळ ट्रेलर आहे. आपल्याला अजून पुढे जायचे आहे. रेल्वेचा कायापालट हीच विकसीत भारताची गॅरंटी असल्याचे ते म्हणाले. रेल्वेत अभूतपूर्व बदल होत आहे. सातत्याने नवनिर्माण होत आहे. रेल्वेचे जाळे विस्तारत आहे. वंदे भारत ट्रेन नेटवर्क आता देशातील 250 हून अधिक जिल्ह्यांत पोहचल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
75 दिवसांत 11 लाख कोटींच्या योजना
रेल्वेच्या इतिहासात एवढं मोठा कार्यक्रम कधीच झाला नसेल. 100 वर्षात पहिल्यांदा असा कार्यक्रम झाला असेल, असा दावा पंतप्रधानांनी केला. देशातील कानाकोपऱ्यात योजनांचे लोकार्पण केलं जातं आहे. नवीन योजना सुरू करण्यात येत आहे. 2024 मध्ये 75 दिवस झाले आहेत. या दिवसात 11 लाख करोड रुपयांची परियोजनाचे लोकार्पण झाले आहे. मागच्या 10 – 12 दिवसांत 7 लाख कोटींपेक्षा जास्त प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले आहे. गुजरात आणि महाराष्ट्र मध्ये एकता मॉल चे लोकार्पण करण्यात आले. लोकल फॉर वोकल मिशन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही योजना आहे. मी तरुणांना सांगेन आज जे लोकार्पण झाले हे तुमच्या उज्वल भविष्यासाठी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
काँग्रेसवर साधला निशाणा
2014 च्या आधीचे रेल्वे बजेट बघा. काय दिलं, असा सवाल करत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. भारत सरकारचे पैसे रेल्वेच्या विकासासाठी वापरण्यात आले. 2014 मध्ये देशातील पूर्वोत्तर राज्य होते ज्यांची राजधानी रेल्वे सोबत जोडली गेली नव्हती. रेल्वे रिझर्वेशनसाठी मोठी लाईन, दलाली होती. मी माझं आयुष्य रेल्वे रुळावर सुरू केलं आहे. दहा वर्षात पूर्वीच्या बजेट पेक्षा 6 पटीने बजेट आम्ही वाढविला आहे. हे 10 वर्षाचं काम ट्रेलर आहे. आणखी काम बाकी आहे. खुप पुढे जायचं आहे. हरिद्वारला कुंभ मेळा होत आहे. वंदे भारत रेल्वेच महत्त्व अधिक वाढणार आहे.आमच्या या प्रयत्नांना काही लोक राजकीय चष्म्यातून बघतात. हे कार्य राजकीय दृष्ट्या नसून देशाच्या विकासासाठी आहे. आधीच्या पिढीने जे भोगल ते येणाऱ्या पिढीने भोगू नये ही मोदींची गॅरंटी आहे. काँग्रेसच्या राज्यात प्रोजेक्ट भटकत राहिला, असा निशाणा त्यांनी साधला. आता पर्यंत 350 आस्था ट्रेन चालली आहे. साडे चार लाखांपेक्षा जास्त प्रवाश्यांनी प्रवास केला आहे.