S. Y. Quraishi | सुशिक्षित हिंदू मुली मुस्लिम मुलांना नेतात, माजी निवडणूक आयुक्तांच्या वक्तव्याची चर्चा
सुशिक्षित हिंदू मुली मुस्लिम मुलांना पळवून नेतात. अशा परिस्थितीत लव्ह जिहादमुळे मुस्लिमांचे अधिक नुकसान होते, असं माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी म्हणाले
नवी दिल्ली : देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी (S. Y. Quraishi) लव्ह जिहादवर (Love jihad) केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. भारतातील हिंदू मुली मुस्लिम मुलांना (Hindu Muslim) घेऊन जातात. त्यामुळे लव्ह जिहादपेक्षा मुस्लिमांना जास्त त्रास होतो, असं कुरेशी म्हणाले. एसवाय कुरेशी यांनी केवळ लव्ह जिहादच नव्हे, तर हिजाब वाद आणि ईव्हीएम हॅकिंगवरही आपले सडेतोड मत मांडले आहे.
लव्ह जिहादवर काय म्हणाले?
लव्ह जिहाद हा केवळ प्रचार (प्रपोगंडा) आहे. यामध्ये मुस्लिम मुलींना जास्त धोका आहे. कारण त्यांच्या दृष्टिकोनातून असे म्हणता येईल, की सुशिक्षित हिंदू मुली मुस्लिम मुलांना पळवून नेतात. अशा परिस्थितीत लव्ह जिहादमुळे मुस्लिमांचे अधिक नुकसान होते, असं माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी म्हणाले
हिजाब वादावर काय म्हणाले?
हिजाबवरुन निर्माण झालेल्या वादावर कुरेशी म्हणाले की, हिजाब हा कुराणचा भाग नाही, मात्र मुलींनी सभ्य-शालीन कपडे घालावेत, असा उल्लेख आहे. शीख नागरिकांना शालेय गणवेशात पगडी आणि सिंदूर लावण्याची परवानगी आहे, मग हिजाबचा त्रास का? हिजाब आवश्यक आहे की नाही याचा निर्णय मौलवी घेतील, न्यायाधीश नाही, असं कुरेशी म्हणाले.
जर शीखांना पगडी घालण्याची आणि हिंदूंना शाळांमध्ये सिंदूर लावण्याची परवानगी आहे, तर मुस्लिमांना हिजाब घालण्यापासून का रोखले जात आहे? असा सवालही कुरेशी यांनी उपस्थित केला.
ईव्हीएमवर कुरेशी काय म्हणाले?
ईव्हीएम नेहमीच विश्वासार्ह राहिले आहे. त्यात छेडछाड केली असती तर पश्चिम बंगालमध्ये भाजपने निवडणूक जिंकली असती. मतपत्रिका भाजपच्या बाजूने असत, असंही कुरेशी म्हणाले. कुरेशी यांच्या वक्तव्यानंतर आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
यूपीतील कथित धर्मांतर प्रकरण, नाशिकमध्ये अटक झालेल्या आतिफच्या कुटुंबीयांचीही कसून चौकशी
Gujrat Love Jihad : हायकोर्टाचा मोठा निर्णय, केवळ लग्न केलं म्हणून गुन्हा दाखल होऊ शकत नाही!
मुलगी तयार, तिच्या घरचे तयार, बाहेरचे म्हणतायत ‘लव्ह जिहाद’, पुण्यात जोडप्याला लग्नाआधीच धमक्या!