मोठी बातमी! माजी मंत्र्यांच्या मुलानं हाताची नस कापली, स्वत:ला घरात कोंडून घेतलं
मोठी बातमी समोर आली आहे, माजी मंत्र्यांच्या मुलानं हाताची नस कापली, त्यानंतर त्याने स्वत:ला घरात कोंडून घेतलं. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक धक्कादायक बामती समोर आली आहे.बसपाच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले राम लखन वर्मा यांच्या मुलानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याने हाताची नस कापून स्वत:ला घरात कोंडून घेतलं.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, दरवाजा तोडून पोलिसांनी या व्यक्तीचा जीव वाचववला आहे.समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना घडली तेव्हा माजी मंत्री राम लखन वर्मा यांचा मुलगा उपकार सिंह हा नशेमध्ये होता, नशेच्या अवस्थेमध्येच त्याने आपल्या हाताची नस कापून घेतली, स्वत:ला घरात कोंडून घेतलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं हजर झाले.
हजरतगंज कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, उपकार सिंह यांना बोलण्यात अडकवले, त्यानंतर पोलिसांनी त्याच्या नकळत दरवाजा तोडला, त्याचा जीव वाचवला. या घटनेत उपकार सिंह हा गंभीर जाखमी झाला आहे, त्याला पोलिसांनीच तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जेव्हा ही घटना घडली तेव्हा तो नशेत होता आणि नशेत असतानाच त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला. आपल्या हाताची नस कापली.मात्र पोलिसांनी दाखवलेल्या समय सूचकतेमुळे माजी मंत्र्याच्या मुलाचा जीव वाचला आहे. ही घटना हजरतगंजमधील डालीबाग परिसरात घडली आहे. इथेच राम लखन वर्मा यांचं निवासस्थान आहे.
आंबेडकरनगर जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी राम लखन वर्मा यांचा मोठा दबदबा होता. ते जलालपूर मतदारसंघातील रहिवासी आहेत. राम लखन वर्मा यांनी 1982 साली राजकारणात पाऊल ठेवलं. ते पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर 1989 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली.बसपाकडून त्यांना तिकीट मिळालं, त्यांनी या निवडणुकीत विजय मिळवला.
सलग तीनदा विजयी
1989 नंतर ते सलग तीनदा विधानसभेचे सदस्य बनले. बसपाच्या पाठिंब्यानं राज्यात मुलायमसिंह यांचं सरकार आलं. मुलायमसिंह यांच्या सरकारमध्ये त्यांना पंचायत राज मंत्रिपद देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर बसपा आणि सपा युती तुटली, मायावती यांनी भाजपच्या पाठिंब्यानं सरकार स्थापन केलं त्यामध्ये देखील ते मंत्री होते.