मणिपूर पुन्हा पेटले; हिंसाचारामुळे इंटरनेट सेवा आणखी काही दिवस बंद; माजी आमदाराने दंगल भडकवली…

| Updated on: May 23, 2023 | 12:01 AM

हिंसाचार रोखण्यासाठी लष्कर आणि निमलष्करी दल राज्यात तळ ठोकून आहेत, तर सातत्याने गस्त घालण्यात येत आहेत. तर त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंसाचारात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले

मणिपूर पुन्हा पेटले; हिंसाचारामुळे इंटरनेट सेवा आणखी काही दिवस बंद; माजी आमदाराने दंगल भडकवली...
Follow us on

इम्फाळ : मणिपूरमध्ये आज पुन्हा एकदा हिंसाचाराची मोठी घटना घडल्याने समाजकंटकांनी लावलेल्या आगीमुळे मोठं नुकसान झाले आहे. मात्र, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे राज्यात पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे इम्फाळच्या चेकोन भागात हिंसाचार भडकवल्याप्रकरणी माजी आमदारासह तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आज माजी आमदारासह तीन जणांना पोलिसांनी इम्फाळ पूर्वेतील न्यू चेकॉन (न्यू लेम्बुलेन) येथून अटक करण्यात आली आहे.

विक्रेते आणि दुकानदारांना धमकावल्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर आता त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. ही घटना घडल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी माहिती देताना म्हटले आहे की, या लोकांकडून तीन बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी सांगितले आहे की, या प्रकरणात आणखी 7 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या लोकांना अटक करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री बिरेन यांनी दुपारी 4 पर्यंत संचाबंदी शिथिल करण्यात आली आहे. मणिपूर गेल्या महिनाभरापासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे.

तर मेईती समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या निषेधार्थ लोकांनी एकता मोर्चा काढला होता. त्यावेळी झालेल्या हिंसाचारामध्ये 70 लोकांचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे या हिंसाचारामुळे हजारो लोकं बेघर झाली होती.

हिंसाचार रोखण्यासाठी लष्कर आणि निमलष्करी दल राज्यात तळ ठोकून आहेत, तर सातत्याने गस्त घालण्यात येत आहेत. तर त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंसाचारात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून त्यांनी दोन्ही समुदायांच्या प्रतिनिधींची भेट घेतली आहे.

हिंसाचार घडत असल्यामुळे मणिपूर सरकारने नवीन अधिसूचना जारी केली आहे. राज्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आलेली असून आणखी पाच दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आता ही बंदी 26 मे पर्यंत राहणार आहे.