दारू घोटाळा कारवाई! केजरीवाल म्हणाले, “मनीष और सत्येंद्र आज के भगत सिंह है, ये आजादी की दूसरी लड़ाई है”
ज्यावेळी अबकारी खात्यातील 11 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते, त्यावेळेपासून हे मद्य धोरणाची सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे.
नवी दिल्लीः दिल्लीतील मद्य घोटाळा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Deputy Chief Minister Manish Sisodiya) यांची अबकारी घोटाळ्याप्रकरणी उद्या सकाळी 11 वाजता सीबीआयने चौकशी (CBI investigationy) होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. चौकशीसाठी उपमुख्यमंत्र्यांना बोलवण्यात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सीबीआयच्या तपासात मी पूर्णपणे सहकार्य करणार असून ते माझी आणखी चौकशी करु शकतात असंही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले की, याआधीही माझ्या घरावर सीबीआयने छापे (CBI Raid) टाकून 14 तास चौकशी केली होती. मात्र त्या चौकशीत सीबीआयला काहीही निष्पन्न झाले नाही असंही त्यांनी सांगितले. ज्या वेळी सीबीआयकडून उपमुख्यमंत्र्यांची झाडाझडती घेण्यात आली.
त्यावेळी त्यांनी माझ्या बँक लॉकरची झडती घेतली होती. मात्र त्यावेळी त्या तपासात काही निष्पण्ण झाले नाही असंही त्यांनी स्पष्ट केले होते.
याआधीही अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) उत्पादन शुल्क धोरणातील घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी दिल्लीत 25 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.
तर ईडीच्या या कारवाईनंतर मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारच्या या लढाईला त्यांनी आझादी दूसरी लडाई म्हटले आहे.
त्यावर अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, जेल की सलाख़ें और फाँसी का फंदा भगत सिंह के बुलंद इरादों को डिगा नहीं पाये,ये आज़ादी की दूसरी लड़ाई है।मनीष और सत्येंद्र आज के भगत सिंह है, 75 साल बाद देश को एक शिक्षा मंत्री मिला जिसने ग़रीबों को अच्छी शिक्षा देकर सुनहरे भविष्य की उम्मीद दी, करोड़ों ग़रीबों की दुआएँ आपके साथ है. अशा प्रकारचे ट्विट करत त्यांनी मनीष सिसोदियांना पाठिंबा दर्शविला आहे.
लेफ्टनंट गव्हर्नर व्ही. के. सक्सेना यांनी नवीन उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील घोटाळ्यातील अनियमिततेची चौकशीची शिफारस करण्यात आली होती.
ज्यावेळी अबकारी खात्यातील 11 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते, त्यावेळेपासून हे मद्य धोरणाची सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर याआधीही 19 ऑगस्ट रोजी सीबीआयकडून नवीन उत्पादन शुल्क धोरणातील घोटाळ्याच्या संशयावरुन सीबीआयकडून त्यांच्या घरावर छापा टाकला होता.
यानंतर ईडीकडून सीबीआयकडून झालेल्या कारवाईची फाईलही मागवून घेण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणी सीबीआयकडून 15 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
जो गुन्हा नोंद करण्यात आला आहे त्या एफआयआरमध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे नाव पहिल्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे.
सीबीआयकडून अबकारी धोरण प्रकरणात अनियमिततेच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर 17 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर दारू व्यावसायिक समीर महेंद्रू, आम आदमी पार्टीचे नेते विजय नायर यांनाही अटक केली गेली होती. तर याच प्रकरणात अभिषेक बोईनपल्ली या व्यक्तीलाही अटक केली गेली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या कारवाईवर सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.