तिरुवनन्तपूरम: रात्री मुंबईत स्फोटकं सापडल्याने खळबळ उडालेली असतानाच केरळमध्ये आज सकाळी कोझिकोड रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर स्फोटक सापडली आहेत. कोझिकोड स्टेशनवर चेन्नई-मंगळुरू सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये 117 जिलेटिन स्टिक आणि 350 डिटोनेटर सापडले आहे. चेन्नईतील एका महिलेकडूनही स्फोटकं ताब्यात घेण्यात आली असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Explosives seized from Kozhikode railway station)
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या सीट खाली स्फोटकांचा साठा सापडला आहे. ही महिला चेन्नईहून थालास्सेरीकडे जात होती. मात्र, ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेनेच ही स्फोटकं आणली होती का? याबाबतच्या वृत्ताला कुणीही दुजोरा दिलेला नाही. ही स्फोटकं या महिलेने आणली की इतर कुणी तिच्या सीट खाली ठेवली याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस या महिलेची कसून चौकशी करत आहे. चौकशीअंतीच पोलिसांकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात येणार आहे.
मुंबई अंबानीच्या घराबाहेर स्फोटकं
मुंबईत काल मुकेश अंबनी यांच्या मुंबईतील बंगल्यासमोर एक अनोळखी कार संशयास्पदरित्या पार्क करण्यात आली होती. ही बाब समोर आल्यानंतर यथे बॉम्ब स्कॉड पथक, एसएसजी कमांडो तसेच मुंबई सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलही घटनास्थळी दाखल झाले होते. बॉम्ब नाशक पथकाने या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये 20 जिलेटीनच्या कांड्या तसेच एक निनावी पत्रही आढळले होते. या पत्रामध्ये ‘ही फक्त झलक आहे’ अशा आशयाचा मजकूर लिहलेला असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण मुंबई काही काळासाठी धास्तावली होती.
दुसरीकडे अंबांनींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस कसून कामाला लागले आहेत. याप्रकरणाचा तपास सध्या गुन्हे शाखेकडे आहे. गुन्हे शाखेकडून या लोकांना शोधण्यासाठी 8 ते 10 पथके तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याची पाहणी सुरु आहे. मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबईच्या इतर भागांमध्येही नाकांबदी करुन वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. याशिवाय, अनेक हॉटेल्स, ढाबा आणि लाँजमध्ये जाऊन पोलिसांची पथके चौकशी करत आहेत. (Explosives seized from Kozhikode railway station)
अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर मुंबईत हायअलर्ट; पोलीस अॅक्शनमध्ये https://t.co/qicc8fTE8i #MukeshAmbani #MumbaiPolice #Antilia #Explosive #Car
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 26, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं भरलेली स्कॉर्पिओ, घातपाताच्या उद्देशाचा संशय
जिथं स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली ते अंबानींचं अँटेलिया हाऊस कसं आहे?
मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळली स्फोटकांनी भरलेली कार; विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी
(Explosives seized from Kozhikode railway station)