Aadhaar मध्ये आला नवं फेस ऑथेंटिफिकेशन फिचर, फक्त स्मार्टफोनच्या मदतीने होणार ‘हे’ महत्त्वाचे काम!
आता UIDAI ने एक नवे फिचर लॉन्च केले आहे. या फिचरमुळे तुम्हाला आता आधारच्या सत्यापणासाठी आधार कार्डची कॉपी सोबत ठेवण्याची गरज नाही.

Face ID authentication app : याआधी तुम्हाला एखाद्या हॉटेलमध्ये जायचे असेल किंवा कॉलेज किंवा अन्य ठिकाणी ओळख द्यायची असेल तर आधार कार्डची हार्ट किंवा सॉफ्ट कॉपी मागितली जायची. यापुढे मात्र असे होणार नाही. कारण UIDAI ने आधार कार्ड स्मार्ट फेस ऑथेंटिफिकेशन फीचर अॅड केलं आहे. या फिचरच्या मदतीने चेहऱ्याला स्कॅन करून आधार कार्डची ओळख पटणार (आधार कार्डचे सत्यापण) आहे.
आधार कार्डची सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी लागणार नाही
माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत फेस आयडी ऑथेंटिफिकेशनबाबात माहिती दिली आहे. फेस आयडी ऑथेंटिफिकेशनसाठी आता आधार कार्डची सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी लागणार नाही. ज्या पद्धतीन यूपीआयच्या मदतीने आर्थिक व्यवहार केले जातात. त्याच पद्धतीने आधारची पडताळणी करू शकता. त्यासाठी फक्त तुमच्याकडे स्मार्टफोन असणे गरजेचे आहे.
New Aadhaar App Face ID authentication via mobile app
❌ No physical card ❌ No photocopies
🧵Features👇 pic.twitter.com/xc6cr6grL0
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) April 8, 2025
वैयक्तिक माहिती राहणार सुरक्षित
UIDAI च्या स्मार्ट ऑथेंटिफिकेशन फीचरमुळे तुमच्या वैयक्तिक आणि खासगी माहितीला कोणताही धोका नसेल. ही माहिती सुरक्षित असेल. आधार कार्डच्या ऑथेंटिकेशनसाठी आता तुम्हाला आधार कार्डची सॉफ्ट किंवा हार्ड कॉपी जवळ असणे गरजेचे नाही. फक्त स्मार्ट फोनच्या मदतीने तुम्ही तुमचा चेहरा स्कॅन करून आधारची पडताळणी करू शकता.
फेस ऑथेंटिफिकेशन कसे होणार?
आधार कार्डचे फेस ऑथेंटिफिकेशन फिचर वापरायचे असेल तर तुमच्याकडे फक्त एक स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला NEW Aadhaar App इन्स्टॉल करावे लागेल. त्यानंतर अॅपमध्ये ज्या स्टेप्स फॉलो करायला सांगितल्या आहेत, त्या कराव्यात. या सर्व स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या आधारची पडताळणी (सत्यापण) करू शकता. सध्यातरी आधार कार्ड फेस ऑथेंटिफिकेशन फिचर हे बिटा टेस्टिंग व्हर्जनमध्ये आहे. त्यामुळे हे फिचर वापरण्यासाठी सामान्यांना थोडी वाट पाहावी लागेल.