भारतीय रेल्वेवर अदानी ग्रुपचा शिक्का! खरं काय?
इंजिनवर जिथे Indian railway लिहिलं जाणं अपेक्षित आहे. तिथे एका खासगी कंपनीचं नाव लिहिण्यात आल्याचा दावा केला जातोय. अनेकांनी रेल्वेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मुंबई: रेल्वेच्या खासगीकरणाच्या बातम्यानंतर आता रेल्वे इंजिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या इंजिनवर जिथे Indian railway लिहिलं जाणं अपेक्षित आहे. तिथे एका खासगी कंपनीचं नाव लिहिण्यात आल्याचा दावा केला जातोय. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पण हा व्हिडीओ खरा आहे का? भारतीय रेल्वे खरंच खासगी कंपनीला देण्यात आली आहे का? या प्रश्नाचं उत्तर अद्याप नाही असंच आहे. (Private company’s stamp on Indian Railways?)
हार्दिक पटेलकडून व्हिडीओ ट्वीट
अनेकांनी हा व्हिडीओ ट्वीटर, फेसबूकवर शेअर करत रेल्वेची प्राईम प्रॉपर्टी खासगी उद्योजकांना विकली जाणार आहे, असं लिहिलं आहे. गुजरातमधील काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनीही हा व्हिडीओ शेअर करत, “भारतीय रेल्वेवर अदानी कंपनीच्या पिठाची जाहीरात पाहण्यासारखी आहे. आता दर खात्रीलायकपणे बोललं जाऊ शकतं की शेतकऱ्यांची लढाई ही सत्याच्या मार्गाने सुरु आहे,” असं म्हटलंय.
भारतीय रेल पर अदानी के फ़्रेश आटे का विज्ञापन देखने लायक़ हैं। अब तो दावे के साथ कह सकते है की किसानों की लड़ाई सत्य के मार्ग पर हैं। pic.twitter.com/WB97kaG6Fe
— Hardik Patel (@HardikPatel_) December 12, 2020
PIBFactcheck ने दावा फेटाळला
दरम्यान, भारतीय रेल्वे खासगी कंपन्यांना विकली गेल्याचा दावा खोटा असल्याचं PIBFactcheck कडून सांगण्यात आलं आहे. ही फक्त एक जाहीरात असल्याचं सांगण्यात आलं आहे. गुजरातमध्ये पश्चिम रेल्वेकडून अतिरिक्त कमाईसाठी 10 रेल्वे गाड्यांवर जाहीरातीसाठी टेंडर काढण्यात आलं आहे. हे टेंडर एका खासगी कंपनीच्या समुहाला मिळालं आहे. त्यानंतर रेल्वे गाड्यांवर अनेक ब्रँडच्या जाहिराती लावण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार या टेंडरमधून रेल्वेला 1 कोटी 5 लाख रुपयाची अतिरिक्त कमाई होईल, असं सांगितलं आहे.
दावा: #फेसबुक पर एक वीडियो के साथ यह दावा किया जा रहा है कि सरकार ने भारतीय रेल पर एक निजी कंपनी का ठप्पा लगवा दिया है। #PIBFactCheck: यह दावा भ्रामक है। यह केवल एक वाणिज्यिक विज्ञापन है जिसका उद्देश्य केवल ‘गैर किराया राजस्व’ को बेहतर बनाना है। pic.twitter.com/vSmK8Xgdis
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 16, 2020
संबंधित बातम्या:
“पुढील महिन्यात भारतीय रेल्वेचं खासगीकरण, 250 रेल्वेचा खासगीकरणात समावेश”
मोदी सरकार रेल्वेचं खासगीकरण करणार?
Private company’s stamp on Indian Railways?