Fact Check Video: उद्योगपती आनंद महिंद्रांनी दहशतवादी यासिन मलिकला Secular, शांततावादी म्हटलं? नवा व्हिडिओ, नवा वाद!

व्हिडिओमध्ये आनंद महिंद्रा म्हणतात की, 'जेकेएलएफचे मुख्य असणारे यासीन मलिक यांनी जे फुटीरतावादी आंदोलन सुरू केले आहे, ते धर्मनिरपेक्ष आहे. आता आपले ध्येय गाठण्यासाठी यासीन मलिक यांनी शांतीच्या मार्गावर चालायला सुरुवात केली. ज्या काश्मिरी पंडितांना निर्वासित केले गेले, त्यांच्या घरवापसीचे मलिक हे खंदे पुरस्कर्ते आहेत.' महिंद्रा यांच्या एका जुन्या वक्तव्यावरून आता नव्याने वाद सुरू झालाय.

Fact Check Video: उद्योगपती आनंद महिंद्रांनी दहशतवादी यासिन मलिकला Secular, शांततावादी म्हटलं? नवा व्हिडिओ, नवा वाद!
यासीन मलिकला कार्यक्रमाला बोलावण्यात आले होते. त्याचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी समर्थन केले होते.
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 2:40 PM

सध्या चर्चेत असलेल्याद काश्मीर फाइल्स‘ (The Kashmir Files) चित्रपटाने देशभरात वादाची राळ उडवलीय. सोशल माध्यमांवर या चित्रपटाबाबत दोन्ही बाजूंनी जुंपलीय. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या चित्रपटाचे कौतुक करत इतके दिवस हे सत्य दडवून ठेवल्याचे म्हटले. या वक्तव्यानंतर तर आरोप-प्रत्यारोपांना धार आलीय. काश्मीर सोडून निर्वासित होणारे पंडित आणि काही दहशतवाद्यांवर यापूर्वी उधळली गेलेली स्तुतीसुमने यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आलीयत. त्यात फुटीरतावादी गट जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (JKLF) प्रमुख यासीन मलिकचे काही व्हिडिओ आणि फोटो सध्या चांगलेच व्हायरल होतायत. त्यावरून उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra), सुप्रसिद्ध लेखिका अरुंधती (Arundhati Roy), माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला (Farooq Abdullah) ते थेट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) अनेकांच्या निशाण्यावर आहेत. जाणून घेऊयात सध्या अतिशय गाजत असलेल्या या प्रकरणाबद्दल. थेट मुळापासून आतापर्यंत.

नेमके प्रकरण काय?

प्रख्यात माध्यम संस्था इंडिया टुडेने यापूर्वी एक कार्यक्रम घेतला होता. त्यात फुटीरतावादी गटाचा मुख्य यासीन मलिकला बोलावले गेले होते. यावरूनही त्यावेळी वाद निर्माण झाला होता. स्वतः काश्मिरी पंडितांनी निदर्शने करून निषेध नोंदवला होता. मात्र, यासीन मलिकला बोलावल्याच्या इंडिया टुडेच्या भूमिकेची थेट उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पाठराखण केली होती. त्यांचा तो व्हिडिओ आता व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये आनंद महिंद्रा म्हणतात की, ‘जेकेएलएफचे मुख्य असणारे यासीन मलिक यांनी जे फुटीरतावादी आंदोलन सुरू केले आहे, ते धर्मनिरपेक्ष आहे. मलिक यांना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांपासून काश्मीर वेगळा हवा आहे. मलिक हे दहशतवादी झाल्यानंतर चर्चेत आले. त्यांनी पाकिस्तानमधील कँपमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतले. त्यानंतर आत्मसमर्पण केले आणि शांततापूर्वक आंदोलन सुरू केले. जेकेएलएफ खरे तर दहशतवादी संघटना होती. मात्र, 1995 पासून त्यांनी सर्व प्रकारच्या हिंसेकडे पाठ फिरवली. आपले ध्येय गाठण्यासाठी शांतीच्या मार्गावर चालायला सुरुवात केली. ज्या काश्मिरी पंडितांना निर्वासित केले गेले, त्यांच्या घरवापसीचे मलिक हे खंदे पुरस्कर्ते आहेत.’ त्यानंतर आनंद महिंद्रा मलिक यांना इंडिया टुडेच्या कार्यक्रमामध्ये बोलवल्याच्या निर्णयाचे स्वागत करताना म्हणतात, ‘यासीन मलिक यांना या कार्यक्रमात बोलावणे वादग्रस्त आहे, पण मी या निर्णयाचे समर्थन करतो. कारण लोकशाहीमध्ये सर्वांचा आवाज ऐकला गेला पाहिजे.’ आता ट्वीटरवर आनंद महिंद्रा यांच्या या वक्तव्यावरून टीकेची झोड उठली गेलीय.

मलिकला कोण वाचवतेय?

ट्वीटर यूजर @UshaNirmala यांनी हा व्हिडिओ ट्वीट करत हे लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणतात, ‘आनंद महिंद्राजी हे किती लज्जास्पद आहे की, जेकेएलफ आणि यासीन मलिक हे काश्मीरी पंडितांच्या नरसंहारात कथितरित्या सहभागी होते.’ काश्मिरी पंडित आणि पत्रकार आदित्य राज कौल यांनी ‘बीबीसी’ला यासीन मलिकने दिलेली मुलाकतच ट्वीट केलीय. ते म्हणतात, ‘दहशतवादी यासीन मलिकला पाहा, कसे हसत-हसत तो म्हणतो की, भारतीय वायुसेनेच्या चार लोकांना काश्मीरमध्ये मारले. भारत सरकार त्याच्याविरोधात खटला सुरू करायला आणि त्याला शिक्षा देण्यात का अयशस्वी झाले? इतक्या दिवसांपासून यासीन मलिकला वाचवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे?’ कौल यांनी हे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना टॅग केले आहे.

न्याय कुठे आहे?

आणखी एक ट्वीटर यूजर @megirish2001 म्हणतात, ‘यासीन मलिकने 1989 मध्ये न्यायमूर्ती नीलकांत गंजू यांचा खून केला. त्याच वर्षी रुबिका सईद यांचे अपहरण केले. 1990 मध्ये भारतीय वायुसेनेच्या 4 जण आणि 2 महिलांनाच खून केला. 40 महिलांना जखमी केले. मात्र, 2005 मध्ये त्यालाच शांती चर्चेसाठी पाकिस्तानला पाठवले. 2006 मध्ये पंतप्रधानांनी त्याला चहा प्यायला बोलावले. 2017 मध्ये त्याने ‘बीबीसी’ला मुलाखत दिली. त्यात त्याने आपल्या कारनाम्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्याला 2019 मध्ये अटक झाली. आज 2022 मध्येही तो अंडर ड्रायल आहे. मग न्याय कुठे आहे?’ असा सवाल त्यांनी केलाय.

हाच खरा इतिहास?

ट्वीटर यूजर @vijaysbo म्हणतात, ‘काश्मीर फाइल्स हा खरा इतिहास आहे. पाहा, दहशतवादी यासीन मलिक तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, अरुंधती राय, फारुक अब्दुल्ला आणि पाकिस्तानी दहशतवादी हाफीज सईदसोबत आहे. लोकांनी हे सारे समजून घ्यावे आणि भारताची रक्षा करावी. 1990 च्या दशकात आणि त्यापूर्वीही काश्मीरी हिंदूवर अत्याचार झाले. त्यामुळे अनेकांना निर्वासित व्हावे लागले. मात्र, त्यावेळी केंद्र सरकार, माध्यमे आणि बुद्धीजीवी वर्गाची भूमिका बुचकळ्यात टाकणारी आणि जनतेला संभ्रमित करणारी होती,’ असाच सूर ट्वीटरवरून व्यक्त होतोय. येणाऱ्या काळात यावरून राजकारण आणि आरोप-प्रत्यारोप रंगणार हे निश्चित.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

Video | ‘अभिव्यक्ती’ म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य नव्हे, संविधानाचा गैरअर्थ नको; उज्ज्वल निकमांकडून कोर्टाचे स्वागत

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.