नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाचा आज (10 जानेवारी) 46 वा दिवस आहे. शेतकरी संघटना आणि मोदी सरकारमध्ये 8 व्या फेरीतील बैठकही निष्फळ ठरली. त्यामुळे शेतकरी आंदोलन (Farmers Protest) सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. उलट आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारला माघार घ्यावीच लागेल, आम्ही मोकळे हात घेऊन जाणार नाही, अस स्पष्ट केलंय. आता शेतकरी आणि सरकारमधील पुढील बैठक 15 जानेवारी रोजी होणार आहे. सोमवारी (11 जानेवारी) शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयात देखील सुनावणी होणार आहे (Farmer leader Naresh Tikait on Farmer Protest stand on Farm Laws of Modi Government).
भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केलीय. ते म्हणाले, “शेतकरी आता मागे हटणार नाही आणि रिकाम्या हाती परतही जाणार नाही.” आंदोलक शेतकऱ्यांनी आज कुस्तीचंही आयोजन केलं. यातून शेतकरी सरकारला संदेश देत आहेत का? असा सवाल केला असता ते नरेश टिकैत म्हणाले, “कुस्ती खेळणं हा आमचा ग्रामीण खेळ आहे. यातून सरकारला काय संदेश देणार? सरकारला तर आपलं स्वतःचं काही दिसेना. सरकारसोबत आमची कोणतीही चर्चा नाही. जर सरकारला शेतकऱ्यांसोबत चर्चा करायची नसेल तर ती त्यांची इच्छा आहे.”
“आमची कुस्ती हा मनोरंजनाचाही भाग आहे आणि सरकारला संदेशही आहे. आता सरकारलाच मागे हटावं लागणार आहे. सरकारने शेतकऱ्यांकडे बरंच दुर्लक्ष केलंय. पण, आता शेतकरी मागे हटणार नाही आणि रिकाम्या हाती परतही जाणार नाही,” असंही टिकैत यांनी नमूद केलं.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवर बोलताना ते म्हणाले, “माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आम्ही आदर करतो. न्यायालय शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूनेच निर्णय घेईल. सरकारने देखील न्यायालयाचं ऐकावं. दुसरा पर्याय हा आहे की सरकारने शेतकऱ्यांचं ऐकावं आणि कायदा मागे घ्यावा.”
हेही वाचा :
तुम्ही तुमचं जेवण करा, आम्ही आमचं जेवून घेऊ; मंत्र्यांसोबत जेवण्यास शेतकऱ्यांचा नकार
शहाजहाँपूर बॉर्डरवर धुमश्चक्री; शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या
मोदी सरकार अंबानी, अदानींसारख्या मक्तेदारांच्या हितासाठी कार्यरत : विश्वास उटगी
Farmer leader Naresh Tikait on Farmer Protest stand on Farm Laws of Modi Government