Farmer Protest : 3 क्विंटल गव्हाची किंमत 1 तोळा सोन्याएवढी करा – राकेश टिकैत

शेतकरी आंदोलनात गेल्या काही दिवसांत प्रमुख चेहरा बनलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी किमान आधारभूत किंमत अर्थात MSP बाबत एक मोठं वक्तव्यं केलं आहे.

Farmer Protest : 3 क्विंटल गव्हाची किंमत 1 तोळा सोन्याएवढी करा - राकेश टिकैत
rakesh tikait
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 9:21 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या 71 दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. या शेतकरी आंदोलनात गेल्या काही दिवसांत प्रमुख चेहरा बनलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी किमान आधारभूत किंमत अर्थात MSP बाबत एक मोठं वक्तव्यं केलं आहे. एका टीव्ही चॅनेलला मुलाखत देताना राकेश टिकैत यांनी गव्हाची किंमत थेट सोन्याच्या किमतीला जोडली. ज्या प्रमाणे सोन्याची किंमत वाढत आहे, त्यानुसार गव्हाची किंमत वाढली पाहिजे असं टिकैत यांनी म्हटलंय. इतकच नाही तर 3 क्विंटल गव्हाची किंमत ही 1 तोळा सोन्याएवढी हवी, असं वक्तव्य टिकैत यांनी केलं आहे.(Rakesh Tikait demands price of 3 quintals of wheat at 1 tola of gold)

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर सिंधू बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनाचं केंद्र आता गाझीपूर बॉर्डर बनलं आहे. तेव्हापासून या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व राकेश टिकैत यांच्याकडे आलं आहे. अशावेळी टिकैत यांनी MSP बाबत केलेलं वक्तव्याला अधिक महत्व प्राप्त झालं आहे. MSP बाबत महेंद्रसिंह टिकैत यांचा फॉर्म्युला लागू केला जावा.

1967 पासून आतापर्यंतचा फरक

“1967 मध्ये सरकारने MSP निश्चित केला होता. तेव्हा गव्हाची किंमत 76 रुपये प्रति क्विंटल होती. तेव्हा प्रायमरी शाळेतील शिक्षकाची पगार महिना 70 रुपये होती. तेव्हा शिक्षक त्याच्या महिन्याच्या पगारात 1 क्विंटल गहू खरेदी करु शकत नव्हता. आम्ही एक क्विंटल गहू विकून अडीच हजार वीट खरेदी करु शकत होतो”, असं टिकैत यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं. “तेव्हा सोन्याची किंमत 200 रुपये प्रति तोळा होती. जो 3 क्विंटल गहू विकून खरेदी केलं जाऊ शकत होतं. आता आम्हाला 3 क्विंटल गव्हाच्या बदल्यात 1 तोळा सोनं द्या आणि त्याच हिशोबाने किंमत निश्चित करा. जेवढी किंमत अन्य वस्तूंची होईल, तेवढीच किंमत गव्हाची व्हायला हवी,” अशी मागणी टिकैत यांनी केली आहे.

जिंद महापंचायतीचं व्यासपीठ कोसळलं

राजधानी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील जिंदमध्ये महापंचायत सुरु होती. त्यावेळी शेतकरी आंदोलक आणि नेते महेंद्रसिंह टिकैत उपस्थित असलेल्या व्यासपीठाचे दोन भाग कोसळले. त्यावेळी राकेश टिकैत यांनी परिस्थिती सावरत व्यासपीठ तर भाग्यवान लोकांचे तुटतात, अशी कोटी केली. हरियाणाच्या जिंदमध्ये कंडेला इथं शेतकऱ्यांची महापंचायत सुरु आहे. या महापंचायतीला संबोधित करण्यासाठी महेंद्रसिह टिकैत उपस्थित झाले आहेत. या ठिकाणी 50 खाप पंचायतीचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. यावेळी टिकैत यांचं भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी झाली होती. त्याच दरम्यान टिकैत उपस्थित असलेल्या व्यासपीठाचे दोन भाग कोसळल्याची घटना घडली.

संबंधित बातम्या :

शेतकरी आंदोलनाला रिहाना ते ग्रेटाच्या पाठिंब्यावर शेतकरी नेते राकेश टिकैत काय म्हणाले?

Greta Thunberg | धमकीचा फरक पडत नाही, शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील; ग्रेटाचं नवं ट्विट

Rakesh Tikait demands price of 3 quintals of wheat at 1 tola of gold

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.