मोठे नेते नसतानाही शेतकऱ्यांची आंदोलनस्थळी गर्दी कायम, काय आहे गाझीपूर बॉर्डरवरील ‘रोटेशन’ पद्धत?

देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु झालेलं (Farm Law) शेतकरी आंदोलन (Farmers Protest) आता 3 महिने झालेत.

मोठे नेते नसतानाही शेतकऱ्यांची आंदोलनस्थळी गर्दी कायम, काय आहे गाझीपूर बॉर्डरवरील ‘रोटेशन’ पद्धत?
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 1:18 AM

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु झालेलं (Farm Law) शेतकरी आंदोलन (Farmers Protest) आता 3 महिने झालेत. अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. असं असलं तरी इतक्या दीर्घकाळ चाललेल्या या आंदोलनात आजही शेतकरी आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाचा कालवधीचा विचार करुन शेती आणि आंदोलन सोबत करण्याची घोषणा केलीय. यानुसार आंदोलनाबाबत रोटेशन नीताचा अवलंब करण्यात येत आहे (Farmer Protest completed 3 months apply rotation policy amid farm work).

शेतकऱ्यांनी निश्चित केलेल्या रोटेशन पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंदोलनस्थळी येण्यासाठी निश्चित वेळ ठरवून देण्यात येत आहे. बाकी जिल्ह्यांमधील लोक त्या वेळेत आपली शेतीची कामं करतील असं ठरलं आहे. याचाच परिणाम म्हणून सोमवारी (1 मार्च) गाझीपूर बॉर्डरवर (Ghazipur Border) कोणताही मोठा शेतकरी नेता हजर नसतानाही पुरेशी आंदोलक शेतकऱ्यांची संख्या राहिली. असं असलं तरी मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या संख्येत कमी-अधिकपणा होता. मात्र, शेतकरी नेत्यांनी ‘रोटेशन’ नीती बनवल्याने प्रत्येक गावातील शेतकरी आळीपाळीने आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत.

शेतकरी आंदोलन अनेक दिवस चालणार

रोटेशन नीतीवर बोलताना भारतीय किसान यूनियनचे उत्तर प्रदेश अध्यक्ष राजवीर सिंह जादौन म्हणाले, “राकेश टिकेत बॉर्डरवर उपस्थित असतात तेव्हा त्यांना भेटण्यासाठी अनेक भागांमधून लोक येतात. त्यावेळी आंदोलनस्थळावरील गर्दी वाढते. हे शेतकरी आंदोलन आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अनेक दिवस चालेल. जशा समुद्राच्या लाटा-लहरी तयार होत असतात तसाच आंदोलनाचाही स्वभाव असतो. त्यात कमी-अधिक लोक येत राहतात.”

शेतीची काम करण्यासाठी शेतकऱ्यांकडून आळीपाळीने आंदोलनाचं धोरण

“गाझीपूर बॉर्डरवर शेतीच्या कामांमुळे आंदोलकांची संख्या कधी अधिक असते तर कधी कमी होताना दिसत होती. सध्या पश्चिम उत्तर प्रदेशात उसतोड आणि उस लागवडीचा काळ आहे. इतरही पिकांची लागवड सुरु आहे. प्रत्येक राज्यात अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या पिकासाठी शेती कामं सुरु आहेत. त्यामुळेच प्रत्येक गावाने आळीपाळीने आंदोलनस्थळी येण्याचा निर्णय घेण्यात आला,” अशी माहिती आंदोलनाच्या आयोजकांकडून देण्यात आलीय.

हेही वाचा :

Toolkit case: ‘टूलकिट तयार करणं गुन्हा नाही’, पोलिसांना फटकारत न्यायालयाचा दिशा रविला जामीन

‘अलविदा! माझी वेळ संपलीय’; खुर्चीत बसताच शेतकरी नेत्याचा मृत्यू

Vidoe: मोदी भाषणात चांगलं बोलतात, पण त्यावर कृती होत नाही! सुप्रिया सुळे यांची शेतकरी आंदोलनावरून टीका

व्हिडीओ पाहा :

Farmer Protest completed 3 months apply rotation policy amid farm work

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.