Farmer Protest : शेतकऱ्यांच्याविरोधात खिळ्यांची स्ट्रॅटेजी सरकारवर बुमरँग? कायमचे उखाडणार की नव्या ठिकाणी ठोकणार?
गाझीपूर सीमेवर पोलिसांनी रोडवर टोकदार खिळे रोवल्याचे फोटो आणि व्हिडीओ संपूर्ण देशात व्हायरल झाले होते. मात्र, त्यावरुन दिल्ली पोलिस आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका झाल्यानंतर हे खिळे काढण्यात येत आहेत.
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवर मोठी खबरदारी घेतल्याचं चित्र पहायला मिळालं. कारण गाझीपूर सीमेवर पोलिसांनी रोडवर टोकदार खिळे रोवल्याचे फोटो आणि व्हिडीओ संपूर्ण देशात व्हायरल झाले होते. मात्र, त्यावरुन दिल्ली पोलिस आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका झाल्यानंतर हे खिळे काढण्यात येत आहेत. प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी खबरदार म्हणून दिल्लीच्या सीमांवर अशाप्रकारच्या टोकदार खिळे आणि मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग केलं आहे.(Work begins to remove sharp nails planted on Delhi border to block farmers)
गुरुवारी सकाळी 11 वाजता टोकदार खिळे हटवण्याचं काम करण्यात आलं आहे. जे लोक हे खिळे हटवत होते, त्यांना विचारलं असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. यावेळी दिल्ली पोलिसांचा एक कर्मचारीही तिथे उपस्थित होता, तो ही या प्रकरणात शांत होता. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हे खिळे आता दुसऱ्या जागी लावल्या जाणार आहेत. तसंच ज्या ठिकाणी गरज भासेल तिथे खिळे लावले जातील असं संबंधित अधिकाऱ्याने सांगितलं.
#WATCH | Nails that were fixed near barricades at Ghazipur border (Delhi-UP border) are being removed. pic.twitter.com/YWCQxxyNsH
— ANI (@ANI) February 4, 2021
खिळे हटवल्यानंतर भारतीय किसान यूनियनकडून प्रतिक्रिया आली आहे की, खिळे हटवण्याचा निर्णय योग्य आहे. अशाप्रकारे नाकाबंदी करुन चर्चा होऊ शकत नाही. देर आये दुरुस्त आये. पण सरकारने असा कुठलाही निर्णय घेता कामा नये, की देशातील जनतेला वाटेल की आम्ही कुठल्या दुसऱ्या देशाच्या सीमेवर बसलो आहोत.
नाकाबंदीवर राहुल, प्रियंका यांचा मोदींवर हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या नाकाबंदीसाठी रस्त्यावर टोकदार खिळे आणि मोठ्या भिंती उभारण्यात आल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला होता. केंद्र सरकारने पूल बांधावेत. भिंती नव्हे, असा टोला राहुल गांधी यांनी ट्विटमधून लगावला. तर, पंतप्रधानजी, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध?, असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला होता.
कुठे खिळे तर कुठे भिंती
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळत होतं. त्यासाठी पोलिसांनी गाझीपूर सीमा, टिकरी बॉर्डर आणि सिंधु बॉर्डरवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी सिमेंटचे बॅरिकेट्सही लावण्यात आले आहेत. त्याशिवया रस्त्यावर मोठमोठे खिळे ठोकण्यात आले होते. अनेक ठिकाणी भिंतीही उभारल्या आहेत. या शिवाय जमावाने दिल्लीत येऊ नये म्हणून सीमेवर टोकदार जाळ्याही लावण्यात आल्या आहेत. दिल्लीच्या सीमेभोवती एक प्रकारची तटबंदीच करण्यात आली आहे. त्यावरून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
संबंधित बातम्या :
पंतप्रधानजी, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध?; प्रियांका-राहुल गांधींचा सवाल
‘M’ वर घमासान, जेव्हा भाजपाने राहुल गांधींचा खापर पणजोबा काढला!
Work begins to remove sharp nails planted on Delhi border to block farmers