“मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करतात, कृषी कायदे मागे घ्या”, दिल्लीत आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन सुरु होऊन 100 दिवस उलटले आहेत.

मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करतात, कृषी कायदे मागे घ्या, दिल्लीत आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 7:43 PM

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन सुरु होऊन 100 दिवस उलटले आहेत. त्यानंतरही सरकारने मागण्या मान्य न केल्यानं शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. आज (7 मार्च) आणखी एका आंदोलक शेतकऱ्याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. तसेच सुसाईड नोट लिहून आपल्या मृत्यूला कृषी कायदे जबाबदार असल्याचं म्हटलं. मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण केली जाते. माझी शेवटची इच्छा कृषी कायदे मागे घ्यावी अशी आहे. सरकारने हे कायदे मागे घ्यावेत, असंही या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे (Farmer Protester suicide on Delhi Border against Farm Laws).

आत्महत्या करणारा शेतकरी हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील होता. त्यांनी टिकरी बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणापासून (Farmers Protest) जवळपास 7 किलोमीटर अंतरावर एका झाडाला गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या 49 वर्षीय शेतकऱ्याने कथितपणे एक सुसाईड नोट लिहिली आहे. दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन सुरुच आहे. हे आंदोलन सुरु होऊन तब्बल 100 दिवस उलटले आहेत.

बहादुरगड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी विजय कुमार म्हणाले, “पीडित शेतकरी राजबीर हे हिसार जिल्ह्यातील रहिवासी होते.” काही शेतकऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याचा मृतदेह झाडाला लटकताना पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?

सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे, “माझ्या आत्महत्येच्या निर्णयाला तिन्ही कृषी कायदे जबाबदार आहेत. केंद्र सरकारने हे कायदे मागे घेऊन माझी शेवटची इच्छा पूर्ण करावी.”

आंदोलक शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढतंच

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या हरियाणाच्या जींदमधील एका शेतकरी आंदोलकाने मागील महिन्यात टिकरी बॉर्डरपासून 2 किलोमीटर अंतरावर एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याआधी हरियाणातील एका शेतकऱ्याने टिकरी बॉर्डरवर विष पिऊन आत्महत्या केली होती. त्याचा नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील एका रुग्णालयात मृत्यू झाला. डिसेंबरमध्ये पंजाबमधील एका वकिलाने टिकरी बॉर्डरवरील आंदोलनापासून काही किलोमीटरवर विष पिऊन आत्महत्या केली होती.

हेही वाचा :

‘अलविदा! माझी वेळ संपलीय’; खुर्चीत बसताच शेतकरी नेत्याचा मृत्यू

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा 46वा दिवस, पुन्हा एका शेतकऱ्याची आत्महत्या

Special Story : शेतीपेक्षा मजुरी बरी!, दर तासाला 100 शेतकरी मजूर का होतात?

व्हिडीओ पाहा :

Farmer Protester suicide on Delhi Border against Farm Laws

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.