Delhi Farmers Tractor Rally : शेतकरी आंदोलन चिघळलं, दिल्लीत काय काय बंद?

| Updated on: Jan 26, 2021 | 5:34 PM

राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाने आयोजित केलेल्या ट्रॅक्टर मार्चला काही ठिकाणी हिंसक वळण लागलंय.

Delhi Farmers Tractor Rally : शेतकरी आंदोलन चिघळलं, दिल्लीत काय काय बंद?
Follow us on

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाने आयोजित केलेल्या ट्रॅक्टर मार्चला काही ठिकाणी हिंसक वळण लागलंय. आक्रमक आंदोलकांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर चढाई केली आहे. या ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झालीय. काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्यात. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा दलं सतर्क झालीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात या आंदोलनावर चर्चा सुरु आहे. आंदोलक अधिक भडकू नये म्हणून दिल्लीत इंटरनेट सेवाही बंद करण्यात आलीय (Farmer Tractor rally become violent Ban on Internet in Delhi).

दिल्लीत शेतकरी आंदोलनाने आक्रमक रुप धारण केल्यानंतर दिल्लीतील इंटरनेट सेवेसह मेट्रो सेवाही बंद करण्यात आलीय. इंडिया गेटकडे जाणारे सर्व मार्ग बद करण्यात आलेत. याशिवाय जामा मशीद देखील बंद करण्यात आली.

दिल्ली हे अतिविशेष व्यक्तीच्या निवासाचं शहर असल्याने या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यापैकीच एक असलेल्या राष्ट्रपती भवनाबाहेर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली. याशिवाय पंतप्रधानांच्या घराबाहेरही चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय.

डीडीयू रस्त्यावर ट्रॅक्टर उलटला, चालक आंदोलकाचा मृत्यू

दरम्यान, डीडीयू रस्त्यावर सुरु असलेल्या ट्रॅक्टर मार्चमधील एक ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. यात ट्रॅक्टर चालवणाऱ्या चालक आंदोलकाचा मृत्यू झालाय. डीडीयू रोडवर पोलिसांकडून ठिकठिकाणी रस्ते अडवण्यात आलेत. त्यातच ट्रॅक्टरचा अपघात होऊन एका आंदोलकाचा मृत्यू झाल्यानंतर आंदोलक चांगलेच आक्रमक झाले. या ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांविरोधात घोषणा देत गोंधळही घातला. शेतकरी आंदोलकांनी आक्रमक रुप धारण केल्याने दिल्लीतील वातावरण चांगलंच तापलंय.

संबंधित बातम्या :

Farmer Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी ‘गुलाबी गँग’ मैदानात

Delhi Farmer Tractor Rally : ‘पुढे जायचं असेल तर आमच्या अंगावरुन ट्रॅक्टर घाला’, नांगलोईमध्ये शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांचाच ठिय्या

Fact Check : शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंगा हटवून आपला झेंडा लावला का? तथ्य काय?

संबंधित व्हिडीओ :

Farmer Tractor rally become violent Ban on Internet in Delhi