मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिन दिल्लीतच साजरा करणार; शेतकऱ्यांचा केंद्राला इशारा

दिल्लीत सुरु असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन थांबणार किंवा नाही, हे उद्या (30 डिसेंबर) दुपारी 2 वाजता शेतकरी नेते आणि सरकारमध्ये होणाऱ्या बैठकीनंतर स्पष्ट होईल.

मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिन दिल्लीतच साजरा करणार; शेतकऱ्यांचा केंद्राला इशारा
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 2:50 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी राजधानी दिल्लीत गेल्या महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. हे आंदोलन थांबणार किंवा नाही, हे उद्या (30 डिसेंबर) दुपारी 2 वाजता शेतकरी नेते आणि सरकारमध्ये होणाऱ्या बैठकीनंतर स्पष्ट होईल. दरम्यान, भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत म्हणाले की, उद्या होणाऱ्या बैठकीत मागण्या मान्य झाल्या तर ठिक अन्यथा 26 जानेवारीच्या अगोदर तर शेतकरी मागे हटणार नाहीत. (Rakesh tikait says farmers will protest till 26 January if talks with government fails)

राकेश टिकैत म्हणाले की, “शेतकरी गेल्या 34 दिवसांपासून शांततेच्या मार्गाने आंदोनल करत आहेत. आम्ही सरकारसमोर शांततेच्या मार्गानेच आमच्या मागण्या मांडणार आहोत. आमचा पूर्वी जो अजेंडा होता, तोच आताही आहे. तिन्ही कायदे रद्द केले जावेत, MSP बाबत कायदा बनवावा आणि स्वामिनाथन आयोग लागू केला जावा, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत”.

टिकैत म्हणाले की, “आधी दरवाजा तोडावा लागेल, तिन्ही कायदे मागे घ्यावे लागतील, त्यानंतरच शेतकरी आणि सरकारमधील चर्चेचा मार्ग मोकळा होईल. 22 दिवसांनंतर तिथूनच बातचित सुरु होईल, जिथे थांबली होती. उद्या सरकारसोबत होणाऱ्या बैठकीसाठी मीदेखील जाणार आहे. काहीतरी मार्ग निघेल, अशी आशा ठेवून आम्ही बैठकीला जाणार आहोत”.

टिकैत म्हणाले की, “उद्या होणाऱ्या बैठकीदरम्यान आमच्या मागण्यांबाबत तोडगा निघाला नाही, तरीदेखील शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरुच राहील. गेल्या 34 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर अजून 34 दिवस आंदोलन करु. 26 जानेवारी रोजी दिल्लीतच प्रजासत्ताक दिन साजरा करु”.

शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये 30 डिसेंबरला वाटाघाटी होणार आहे. याआधीही बऱ्याच वेळा वाटाघाटी करण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. दुसरीकडे शेतकरी संघटना सातत्याने आंदोलन अधीक तीव्र करण्याचा इशारा देत आहेत.

…तर मी आयुष्यातलं शेवटचं आंदोलन करेन; अण्णा हजारेंचा केंद्राला इशारा

दरम्यान, शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. अहमदनगरमधील राळेगणसिद्धी येथे (Ralegan Siddhi Village) अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलत असताना केंद्र सरकारला आंदोलनाचा इशारा दिला.

अण्णा हजारे म्हणाले की, “शेतकऱ्यांसाठी गेल्या तीन वर्षांपासून आंदोलन करत आहे, परंतु सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत. हे सरकार केवळ पोकळ आश्वासनं देत आहे. त्यामुळे माझा त्यांच्यावर बिलकुल विश्वास नाही. सरकार माझ्या मागण्यांचा विचार करतंय का? त्यादृष्टीने काही पावलं उचलतंय का ते आपण पाहुया. त्यांनी एक महिन्याचा अवधी मागितला आहे. त्यामुळे मी त्यांना जानेवारी महिन्याची मुदत दिली आहे. जर माझ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मी आमरण उपोषणाला बसेन. हे माझं शेवटचं आंदोलन असेल”.

शरद पवारांची केंद्र सरकारला डेडलाईन; शेतकरी आंदोलनावर तोडगा काढा नाही तर…

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला तरी त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शरद पवारांनी शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारला 30 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. 30 डिसेंबरपर्यंत तोडगा न काढल्यास विरोधी पक्षाला त्याचा विचार करावा लागेल, असा इशाराच पवारांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

29 डिसेंबरच्या बैठकीला शेतकरी तयार, मात्र सरकारसमोर ‘या’ अटी

Farmer Protest : मोदींच्या आवाहनानंतर शेतकऱ्यांनी बैठक बोलावली, पुढील रणनीती ठरवणार

(Farmers Protest : Rakesh tikait says will not move till 26 January if talks with government fails)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.