गुपकार घोषणा: “आम्ही भाजपविरोधी आहोत, देशविरोधी नाही”, पीपल्स अलायन्सच्या बैठकीत फारुक अब्दुल्ला गरजले

जम्मू काश्मिरमध्ये पुन्हा कलम 370 लागू करण्याच्या मागणीसह गुपकार घोषणा करण्यासाठी श्रीनगरमध्ये आज (24 ऑक्टोबर) ‘पीपल्स अलायन्स’ची महत्त्वाची बैठक झाली.

गुपकार घोषणा: “आम्ही भाजपविरोधी आहोत, देशविरोधी नाही”, पीपल्स अलायन्सच्या बैठकीत फारुक अब्दुल्ला गरजले
Follow us
| Updated on: Oct 24, 2020 | 8:43 PM

श्रीनगर : जम्मू काश्मिरमध्ये पुन्हा कलम 370 लागू करण्याच्या मागणीसह गुपकार घोषणा करण्यासाठी श्रीनगरमध्ये आज (24 ऑक्टोबर) ‘पीपल्स अलायन्स’ची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांना पीपल्स अलायन्सचे अध्यक्ष आणि पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती यांना उपाध्यक्ष पद देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी फारूक अब्दुल्ला यांनी आम्ही भाजप विरोधी आहो, देश विरोधी नाही, असं मत व्यक्त केलं (Farooq Abdullah after peoples alliance meet for Gupkar declaration we are anti BJP not anti national).

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या घरी झालेल्या गुपकार घोषणेच्या या बैठकीत फारूक अब्दुल्ला यांच्या व्यतिरिक्त उमर अब्दुल्लांसह अनेक नेते सहभागी झाले होते. सीपीएमचे नेते मोहम्मद यूसुफ तारिगामी यांच्याकडे पीपल्स अलायन्सच्या संयोजकपद देण्यात आलं आहे. पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन यांना प्रवक्ता म्हणून घोषित करण्यात आले.

बैठकीनंतर फारूक अब्दुल्ला यांनी माध्यमांना संबोधित करताना म्हटलं, “पीपल्स अलायन्स ही कोणतीही देशविरोधी आघाडी नाही. आम्ही भाजपविरोधी आहोत, देशविरोधी नाही. आमचा उद्देश जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या नागरिकांना त्यांचे अधिकार पुन्हा मिळवून देणे हा आहे. आमच्यात धर्माच्या नावाने फूट पाडण्याचे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. ही धार्मिक लढाई नाही.”

पीपल्स अलायन्सची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच महबूबा मुफ्ती यांच्या निवासस्थानी आलेल्या सर्व नेत्यांनी आघाडीचं प्रतिक म्हणून जम्मू आणि काश्मीरचा जुन्या ध्वजाला मान्यता दिली आहे. आघाडीची पुढील बैठक जम्मूमध्ये होणार आहे. यानंतर 17 नोव्हेंबरला श्रीनगरमध्ये एक संमेलनही आयोजित केलं जाणार आहे.

हेही वाचा :

जम्मू काश्मीरचा झेंडा मिळत नाही तोपर्यंत अन्य ध्वज फडकवणार नाही, मेहबुबा मुफ्तींचे वक्तव्य, भाजपची अटकेची मागणी

फारुख अब्दुल्लांची ED कडून चौकशी, ओमर अब्दुल्लांचा सुडाचा आरोप

Farooq Abdullah after peoples alliance meet for Gupkar declaration we are anti BJP not anti national

Non Stop LIVE Update
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.