1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांना FASTag बंधनकारक, मोदी सरकारचा मोठा निर्णय

1 जानेवारी 2017 मध्ये FASTag अनिवार्य करण्यात आलं होतं. 2017 नंतर सर्व डिलरकडून नव्या वाहनांवर याचा वापर केला जात आहे. यासह जुन्या वाहनांनाही आता FASTag लावणं अनिवार्य होणार आहे.

1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांना FASTag बंधनकारक, मोदी सरकारचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Nov 08, 2020 | 10:06 AM

नवी दिल्ली: चारचाकी वाहनांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक करण्यात आलं आहे. संपूर्ण देशातील टोल नाक्यांवर डिजिटल पेमेंट सिस्टिमला चालना देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार M आणि N प्रकारातील वाहनांनाही आता FASTag चा स्टीकर लावावा लागणार आहे. केंद्रीय मोटार वाहन अधिनियम – 1989 मध्ये केंद्र सरकारने बदल केला आहे. (FASTag is Mandatory for all four wheelers from January 1, 2021)

आता जुन्या वाहनांनाही FASTag बंधनकारक

1 जानेवारी 2017 मध्ये FASTag अनिवार्य करण्यात आलं होतं. 2017 नंतर सर्व डिलरकडून नव्या वाहनांवर याचा वापर केला जात आहे. यासह जुन्या वाहनांनाही आता FASTag लावणं अनिवार्य होणार आहे.

विना FASTag विमाकवच नाही!

सध्या ट्रान्सपोर्टच्या वाहनांचं फिटनेस सर्टिफिकेट अपडेट करताना गाडीत FASTag चं स्टीकर तपासलं जात आहे. मंत्रालयाकडून सुरुवातीलाच हे स्पष्ट करण्यात आलं आहे की वाहनांचा विमा काढताना विमा कंपनी सुरुवातीला आपला FASTag तपासणार आहे. तुम्ही तुमच्या वाहनांवर FASTag स्टीकर लावलेलं नसेल तर तुमचा विमा अपडेत होणार नाही.

FASTag बाबत शंका असेल, तर हे नक्की वाचा…

प्रश्न : फास्टॅग काय आहे आणि कसं काम करतं?

उत्तर : डिजीटल पेमेंटला वाव देण्यासाठी फास्‍टॅगला राष्ट्रीय महामार्गांच्या टोल नाक्यांवर लागू करण्यात आलं आहे. फास्‍टॅगला गाडीच्या विंडस्क्रीनवर लावावं लागतं. याला लावल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावरुन जाताना तिथे लावण्यात आलेले कॅमरे या फास्टॅगला स्कॅन करतात. त्यानंतर टोलची रक्कम तुमच्या बँक खात्यातून आपोआप कापली जाते. ही प्रक्रिया अगदी काही सेकंदांमध्ये पूर्ण होते. गाडीच्या विंडस्क्रीनवर लागलेला फास्टॅग मोबाईल फोनसारखा रिचार्ज होतो. फास्टॅगला My FASTag अॅप किंवा नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, यूपीआय आणि इतर कुठल्याही पद्धतीने रिचार्ज केलं जाऊ शकतं.

प्रश्न : FASTag रिचार्ज / टॉप-अपसाठी कुठली मर्यादा आहे का?

उत्तर : ग्राहक 100 रुपयांच्या मूल्यवर्गात फास्टॅग खात्याला रिचार्ज करु शकतात. तर रिचार्जची सर्वाधिक रक्कम ही वाहन आणि खातं लिंकच्या प्रकाराच्या आधारावर निश्चित केली जाते. रिचार्जची जास्तीतजास्त रक्कम सर्व बँकांच्या वेबसाईट्सवर देण्यात आली आहे.

प्रश्न : फास्‍टॅग कुणाला मिळणार?

उत्तर : फास्‍टॅग ती प्रत्येक व्यक्ती घेऊ शकते जिच्याकडे चारचाकी वाहन किंवा कुठलं मोठं वाहन आहे. यासाठी वाहनाचं रजिस्‍ट्रेशन सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो, अॅड्रेस प्रूफ व्यतिरिक्त केवायसी कागदपत्रांची एक प्रत आवश्यक असेल.

प्रश्न : फास्‍टॅगचा महिन्याचा पास कसा बनवता येईल?

उत्तर : महिन्याच्या पासची सुविधा प्रत्येक टोल नाक्यावर उपलब्ध आहे. तुम्ही महिन्याच्या पाससाठी आवश्यक माहिती मिळवण्यासाठी टोल फ्री ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधू शकता. तुम्ही एनएचएआयच्या वेबसाईटवरही महिन्याभराच्या पासची सुविधा मिळवू शकता.

प्रश्न : माझ्याजवळ दोन वाहनं आहेत. मग मी एक FASTag चा वापर दोन्ही वाहनांसाठी करु शकतो का?

उत्तर : ग्राहक एका वाहनसाठी फक्त एक टॅगचा वापर करु शकतात. एकदा हे FASTag गाडीच्या विंडस्‍क्रीनवर चिकटवलं, त्यानंतर त्याला काढता येणार नाही. जर तुम्ही जबरदस्ती हे टॅग काढण्याचा प्रयत्न कराल तर तो नष्ट होऊन जाईल आणि टोल नाक्यावर तुमच्या काहीही कामात येणार नाही.

प्रश्न : जर माझं FASTag टोल नाक्यावर काम करत नसेल तर काय करायचं?

उत्तर : जर तुमचं FASTag टोल नाक्यावर स्विकारलं जात नसेल तर तुम्ही टोल-फ्री क्रमांक 1033 वर संपर्क साधू शकता.

प्रश्न : माझं FASTag कुठल्या टोल नाक्यावर काम करेल? याची माहिती कुठे मिळेल?

उत्तर : देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील 536 पेक्षा जास्त टोल नाक्यांवर हे FASTag स्विकारलं जाईल. या टोल नाक्यावर फास्‍टॅग लेन बनवण्यात आले आहे. हे लेन 500 मीटर दूरुनच नजरेस पडते. FASTag च्या माध्यमातून कशाप्रकारे टोल भरावा हे तुम्ही टोल बूथवरील कर्मचाऱ्यालाही विचारु शकता.

अधिक माहितीसाठी https://www.npci.org.in/sites/all/themes/npcl/images/PDF/Plaza%20Master-31-08-2019%20-%20PDF.pdf  या लिंकवर क्‍लिक करा. या संकेतस्थळी तुम्हाला सर्व टोल नाक्यांची माहिती मिळेल.

प्रश्न : FASTag बाबत कुठला टोल कर्मचारी चुकीची वागणूक करत असेल तर काय करायचं?

उत्तर : अशा परिस्थितीत टोल नाक्यावरील संबंधित प्रोजेक्‍ट डायरेक्‍टरजवळ आपली तक्रार नोंदवावी. शिवाय, या घटनेची तक्रार etcnodal@ihmcl.com या संकेतस्थळावरही केली जाऊ शकते. तसेच, तुम्ही टोल फ्री क्रमांक 1033 वर संपर्कही साधू शकता.

संबंधित बातम्या:

FASTag बाबत शंका असेल, तर हे नक्की वाचा…

शिथिलता येताच मुंबईकर सुटले, ‘बेस्ट’साठी गर्दी, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

FASTag is Mandatory for all four wheelers from January 1, 2021

'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.