Video : पूर्व दिल्ली महापालिकेत लाथा-बुक्क्यांचा प्रसाद आणि शिव्यांची लाखोली! AAP आणि BJP नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी

भाजपने आणलेल्या प्रस्तावरुन आप आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. या राड्याचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्यावर मजेशीर कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.

Video : पूर्व दिल्ली महापालिकेत लाथा-बुक्क्यांचा प्रसाद आणि शिव्यांची लाखोली! AAP आणि BJP नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी
पूर्व दिल्ली महापालिकेत आप आणि भाजप नगरसेवकांमध्ये राडाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 8:18 PM

नवी दिल्ली : बिहार विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये झालेला राडा आपण पाहिला. त्यानंतर आता पूर्व दिल्ली महापालिकेत (East Delhi Municipal Corporation) लाथा-बुक्क्या आणि जोरदार शिवीगाळ ऐकायला मिळाली. महापालिकेच्या शेवटच्या बैठकीवेळी आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) आणि भाजप नेत्यांमधअये जोरदार हाणामारी झावली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी ज्या पद्धतीने काश्मिरी पंडितांची (Kashmiri Pandits) खिल्ली उडवली. त्याबद्दल आप नेत्यांनी आणि नगरसेवकांनी माफी मागावी, असा निषेधाचा ठराव भाजप नगरसेवकांनी बैठकीत आणला होता. या प्रस्तावरुनच आप आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. या राड्याचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्यावर मजेशीर कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.

काश्मिरी पंडितांसाठी चित्रपटाची नाही तर त्यांचं पुनर्वसन होण्याची गरज आहे, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते. तसंच ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटावरुन भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. इतकंच नाही तर इंडिया टुडेच्या एका मुलाखतीत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपला जोरदार टोलाही लगावला. केजरीवाल म्हणाले की, काश्मिरमध्ये मोठी दुर्घटना घडली. 32 वर्षे झाल्यानंतर सरकार काश्मिरी पंडितांना सांगतं की आम्ही तुमच्यासाठी चित्रपट बनवला आहे.

भाजप आणि आप नगरसेवकांमधील फ्रीस्टाईल हाणामारी!

अरविंद केजरीवालांचा भाजप, पंतप्रधानांवर निशाणा

दिल्लीत ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपट करमुक्त करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येतेय. त्या पार्श्वभूमीवर विधानसभेत बोलताना केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार हल्ला चढवला होता. ‘संपूर्ण भारतीय जनता पार्टी देशभरात एका चित्रपटाचे पोस्टर लावत आहे. असे चित्रपटाचे पोस्टर लावण्यासाठी तुम्ही राजकारणात आले होते काय? तुमच्या मुलांना काय उत्तर द्याल घरी जाऊन? मुलं विचारतील बाबा काय काम करता? त्यांना सांगाल का चित्रपटाचे पोस्टर लावतो म्हणून. 8 वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावे लागले, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्षे त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेलं नाही. 8 वर्षे खराब केले. विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी त्यांना लोळण घ्यावं लागत आहे की वाचव वाचव वाचव म्हणून… अशा शब्दात अरविंद केरजीवाल यांनी द काश्मिर फाईल्सच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.

केजरीवालांचा मोदींवर हल्लाबोल

अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर केलेल्या हल्ल्यानंतर आप नेते आणि नगरसेवकांनी माफी मागावी असा प्रस्ताव भाजप नगरसेवकांनी ठेवला होता. त्यावरुन पूर्व दिल्ली महापालिकेत दोन्ही पक्षाचे नगरसेवक आपसांत भिडले. यावेळी सभागृहातील गार्ड्सनी त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाथा-बुक्क्यांचा वापर करत आणि शिव्यांची लाखोली वाहत दोन्ही पक्षाचे नगरसेवक एकमेकांवर हल्ला चढवत होते.

इतर बातम्या : 

Amit Shah: दिल्लीतील तिन्ही महापालिका एक होणार, अमित शहांकडून MCD दुरुस्ती विधेयक सादर

BJP Attack on Kejriwal: दिल्लीत केजरीवालांच्या घरावर नेमका हल्ला कसा झाला? CCTV फुटेजनं भाजप युवा मोर्चाला उघडलं पाडलं, पाहा व्हिडीओ

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.