उन्नाव बलात्कार पीडितेचा कार अपघात, भाजप आमदार सेनगर यांच्यासह 25 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल

उत्‍तर प्रदेशमधील रायबरेली येथे रविवारी (28 जुलै) उन्‍नाव सामुहिक बलात्कार पीडितेच्या गाडीला एका ट्रकने धडक दिली. यात पीडितेच्या 2 नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे, तर स्वतः पीडिताही गंभीर जखमी झाली आहे.

उन्नाव बलात्कार पीडितेचा कार अपघात, भाजप आमदार सेनगर यांच्यासह 25 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Jul 29, 2019 | 7:50 PM

लखनौ: उत्‍तर प्रदेशमधील रायबरेली येथे रविवारी (28 जुलै) उन्‍नाव सामुहिक बलात्कार पीडितेच्या गाडीला एका ट्रकने धडक दिली. यात पीडितेच्या 2 नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे, तर पीडिता गंभीर जखमी झाली. बलात्कारातील आरोपी भाजप आमदार कुलदीप सेनगर यांनीच आपल्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

पीडित कुटुंबाने भाजप आमदार कुलदीप सिंह सेनगर यांच्यासह 10 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या व्यतिरिक्त अन्य 15 अज्ञातांचाही तक्रारीत समावेश आहे. भाजप आमदार कुलदीप सिंह सेनगर हे उन्‍नाव सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी आहेत.

उन्नाव येथे सामुहिक बलात्कार झालेल्या पीडितेचे चुलते तुरुंगात आहेत. त्यांना भेटण्यासाठी पीडिता, तिची चुलती, वकील महेंद्र सिंह आणि इतरजण रायबरेली तुरुंगात जात होते. दरम्यान एका ट्रकने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. यात पीडितेच्या चुलती आणि मावशीचा मृत्यू झाला, तर पीडिताही गंभीर जखमी झाली. जखमींना लखनौ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. हा अपघात रायबरेलीतील अतरुआ गावात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन तपास सुरु केला.

विशेष म्हणजे अपघात घडला तेव्हा पीडितेला देण्यात आलेले सुरक्षारक्षक सोबत नव्हते. त्याबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्याची मागणी केली आहे.

पीडितेच्या चुलत्याने दाखल केलेल्या तक्रारीत (FIR) आमदार कुलदीप सिंह सेनगर आणि त्यांचा भाऊ मनोज सेनगर यांच्या नावासह 10 जणांचा समावेश आहे. आयपीसीचे कलम 302, 307, 506, 120बी अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींची नावे

  • कुलदीप सिंह सेनगर
  • मनोज सिंह सेनगर
  • विनोद मिश्र
  • हरिपाल मिश्र
  • नवीन सिंह
  • कोमल सिंह
  • अरुण सिंह
  • ज्ञानेन्द्र सिंह
  • रिंकू सिंह
  • एडवोकेट अवधेश सिंह
  • 15-20 इतर अज्ञात लोक

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.