जेलमधून भाजप आमदाराला फोन करणं महागात, लालू यादवांविरोधात गुन्हा दाखल

लालू यादव यांच्याविरोधात तरुंगातून भाजप आमदार ललन पासवान यांना फोन केल्याप्रकरणी पाटण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जेलमधून भाजप आमदाराला फोन करणं महागात, लालू यादवांविरोधात गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 8:11 PM

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. लालू यांच्याविरोधात तरुंगातून भाजप आमदार ललन पासवान यांना फोन केल्याप्रकरणी पाटण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आमदार ललन पासवान यांनीच लालूंविरोधात तक्रार केली आहे. त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे (FIR against Lalu Prasad Yadav for Phone call to BJP MLA from jail).

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लालूंना भाजप आमदाराला केलेला फोन महागात पडल्याचं दिसत आहे. लालू चारा घोटाळ्या प्रकरणी शिक्षा भोगत आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीच तब्येतीच्या कारणामुळे त्यांना रांची येथील एका बंगल्यात ठेवण्यात आले होते. मात्र, फोन प्रकरणानंतर त्यांना लगेचच रिम्समधील खासगी वार्डात शिफ्ट करण्यात आलं. भाजपने लालू प्रसाद यादव यांच्यावर तुरुंगात शिक्षा भोगत नसून बंगल्यात आराम करत असल्याचाही आरोप केला होता.

लालूंवर तुरुंगातून भाजप आमदार ललन पासवान यांना फोन करत आमिष दाखवण्याचा आरोप आहे. यावरुन हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे (HAM) अध्यक्ष जीतनराम मांझी म्हणाले, “लालू प्रसाद यादव यांनी अनेक लोकांना फोन केल्याची माहिती मला मिळाली आहे. ते माझ्याशी देखील बोलू इच्छित होते, पण मी बोलण्यास नकार दिला. लालू प्रसाद यादव यांचा हेतू चुकीचा आहे.”

लालूंनी एनडीएच्या आमदारांना आमिष दाखवत नितीश सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, सुशील कुमार मोदींचा आरोप

भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी लालू प्रसाद यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. लालूंनी त्यांना ठेवण्यात आलेल्या बंगल्यावरुन एनडीएच्या आमदारांना फोन केला आणि आमिष दाखवलं. तसेच नितीश कुमार यांचं बिहारमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सुशील मोदी यांनी केलाय. भाजपने लालू यादव आणि आमदार ललन पाासवान यांच्यातील फोन कॉलचा ऑडिओ देखील जारी केला होता.

ललन पासवान म्हणाले, “लालू यादव यांनी मला मंत्रिपद देण्याचं आमिष दाखवलं आणि बिहार विधानसभेच्या सभापतींच्या निवडीच्या वेळी गैरहजर राहण्यास सांगितलं. मात्र, मी भाजपसोबतच आहे.”

संबंधित बातम्या :

बिहार विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत जोरदार राडा, नितीश कुमारांना विधानसभेतून बाहेर काढण्यावर तेजस्वी अडले!

एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला, तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले आणि टिकले; शिवसेनेचा भाजपला टोला

‘तरुणांचं बेरोजगारीवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपचं नाटक’, लव जिहादच्या मुद्द्यावर असदुद्दीन ओवेसी यांचं प्रत्युत्तर

FIR against Lalu Prasad Yadav for Phone call to BJP MLA from jail

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.