अखेर वारिस पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (AIMIM) अर्थात एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण (FIR against Waris Pathan) यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे.

अखेर वारिस पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Feb 22, 2020 | 9:48 AM

बंगळुरु : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (AIMIM) अर्थात एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण (FIR against Waris Pathan) यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांनी (FIR against Waris Pathan) हा गुन्हा नोंदवला. आम्ही 15 कोटी असलो तरी 100 कोटींवर भारी आहोत असं म्हणत वारिस पठाण यांनी हिंदू-मुस्लिमांबाबत भाष्य केलं होतं. कर्नाटकातील गुलबर्गा इथल्या सभेत वारिस पठाण यांनी हे वक्तव्य केलं होतं.

वारिस पठाण यांच्याविरोधात कलम 117,153 (दंगलीसाठी भडकावना) आणि कलम 153 ए (दोन समाजात तेढ निर्माण करणे) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गुलबर्गा इथं 19 फेब्रुवारी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जाहीर सभेच आयोजन केलं होतं. त्या रॅलीत वारीस पठाण यांनी वादग्रस्त विधान केलं होतं.

वारीस पठाण काय म्हणाले होते?

कर्नाटकातल्या गुलबर्गा इथे वारिस पठाण यांनी जाहीर भाषणात वादग्रस्त विधानं केलं. “आता आपल्याला एकत्र आलं पाहिजे. एकत्रितपणे लढलं पाहिजे. स्वातंत्र्य तर मिळायलाच हवं. मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्या. 15 करोड हैं मगर 100 के उपर भारी हैं, ये याद रखना. इट का जवाब पत्थर से’ हे आता आम्ही शिकलो आहोत. स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. ते मागून मिळालं नाही, तर हिसकावून घ्या”, असं चिथावणीखोर वक्तव्य वारीस पठाण यांनी केलं.

ओवेसी नाराज

वारिस पठाण यांच्या या विधानानंतर देशभरात वादाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात तर ठिकठिकाणी वारिस पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं जात आहे. खुद्द पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वारिस पठाण यांना पुढील आदेशापर्यंत माध्यमांशी न बोलण्यास बजावलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “वारिस पठाण यांचं वक्तव्य निंदनीय आहे. खरंतर या देशात 100 कोटीहून अधिक हिंदू असल्यानेच देशात कुणालाही बोलण्याचा अधिकार आहे, हे वारिस पठाण यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अशाप्रकारे एखाद्या मुस्लीम राष्ट्रामध्ये कुणी बोललं असतं, तर तेथे काय अवस्था झाली असती? हे वारिस पठाण यांनी लक्षात घ्यायला हवं.”

गुजरात आठवतंय का? : गिरीश व्यास

भाजप प्रवक्ते आमदार गिरीश व्यास म्हणाले, “वारिस पठाणने एकदा नागपुरात येऊन दाखवावं, आम्ही त्यांची योग्य व्यवस्था करु, आम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारिस पठाणवर मुंबईबंदीची कारवाई करुन अटक करावी. वारिस पठाणला देशद्रोही म्हणून पाकिस्तानला पाठवावं. वारिस पठाणला गुजरात आठवत असेल, तिथला मुसलमान हिम्मत करत नाही. वारिस पठाणसारखी जहरी टीका करणाऱ्यांची जीभ छाटण्याची ताकद भाजपच्या कार्यकर्त्यात आहे”.

दगडाला दगडाने, तलवारीला तलवारीने उत्तर : मनसे

वारीस पठाण यांच्या या वक्तव्यानंतर मनसेने त्यांना रोखठोक इशारा दिला आहे. “दगडाचं उत्तर दगडाने, तलवारीचं उत्तर तलवारीने, हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं आहे, तसंच उत्तर दिलं जाईल”, असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

संबंधित बातम्या  

बेवकूफ, जाहील, एकत्र राहण्याच्या काळात असं बोलाल तर 15 कोटीच रहाल : जावेद अख्तर

वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया  

वारिस पठाण गुजरात आठवतंय का? : भाजप प्रवक्ते गिरीश व्यास  

15 कोटी काय, त्यांच्यामागे 15 जण आले तरी सत्कार करेन, वारिस पठाणांना संजय राऊतांचा टोला

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.