उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भीषण आग, पुजाऱ्यासह 13 जण जखमी

मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात सोमवारी सकाळी भस्म आरती सुरू असताना मोठा अपघात झाला. आरतीवेळी मंदिरात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचवेळी गुलालाची उधळण होताच आग लागली. या आगीत मुख्य पुजाऱ्यासह 13 जण होरपळले. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भीषण आग, पुजाऱ्यासह 13 जण जखमी
महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान लागली भीषण आग.
Follow us
| Updated on: Mar 25, 2024 | 9:14 AM

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरात सोमवारी सकाळी मोठा अपघात झाला. मंदिराच्या गर्भगृहात होळीच्या दिवशी भस्म आरती सुरू असताना अचानक आग लागली आणि यामध्ये 13 जण होरपळले. जखमींमध्ये पुजारी आणि मंदिरातील सेवकांचाही समावेश आहे. आरतीदरम्यान गुलाल उधळल्याने अचानक भीषण आग लागल्याचे समजते. सर्व जखमींना तातडीनेजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आलं. महाकाल मंदिरातील भस्मारतीचे मुख्य पुजारी संजय गुरु, विकास पुजारी, मनोज पुजारी, अंश पुरोहित, सेवक महेश शर्मा आणि चिंतामण गेहलोत यांच्यासह अनेक जण जखमी झाले.

उज्जैनचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात भस्म आरतीच्या वेळी गुलालही वापरला जातो. आज भस्म आरतीदरम्यान गर्भगृहात कापूरही पेटवण्याच आला, त्यातच गुलाल उधळण्यात आला. ज्यामुळे अचानक भीषण आग लागली आणि आरतीसाठी उपस्थित असलेल्यांपैकी 13 जण होरपळले. त्यामध्ये मंदिरातील पुजाऱ्यांचाही समावेश आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झालेलं नाही. सर्वांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत लक्ष ठेवून आहेत. या घटनेनंतरही मंदिरात दर्शन व्यवस्थित सुरू असून, तेथे कोणतीही समस्या अथवा अडचण निर्माण झालेली नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

आगीची ही घटना घडली तेव्हा जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती होती. सर्वजण होळीनिमित्त दर्शनासाठी आले होते. गर्भगृहात पुजारी आरती करत होते, तेवढ्यात मागून कोणीतरी गुलाल उधळला, तो दिव्यावर पडला आणि आग लागली. त्या गुलालमध्ये केमिकल असल्याने आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गर्भगृहाच्या भिंती आणि छतावर चांदीचा लेप लावण्यात आला आहे. होळीच्या दिवशी बाबा महाकालला गुलाल अर्पण केला जातो आणि पुजारीदेखील एकमेकांना रंग लावतात. मात्र हे रंग लागून गर्भगृहाच्या भिंती खराब होऊ नयेत यासाठी यंदा फ्लेक्स लावण्यात आले होते. मात्र गर्भगृहात एकमेकांवर गुलालाच वर्षाव होत असताना तो गुलाल आरतीच्या ताटातील कापूरावर उधळला आणि कापूरने पेट घेतल्याने आग लागली.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
मात्र तेथील उपस्थितांनी वेळीच प्रसंगावधना दाखवून आग आटोक्यात आणली.  आग लागल्यानंतर काहींनी अग्निशमन यंत्राच्या साह्याने आग आटोक्यात आणत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र तोपर्यंत गर्भगृहात आरती करत असलेल्या पुजाऱ्यांसह 13 जण जखमी झाले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  चौकशी याची समिती करेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.