ओडिशातील जंगलांमध्ये 10 दिवसांपासून धुमसती आग, 3000 प्रकारच्या वनस्‍पती धोक्यात

ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यात सिमलीपाल नॅशनल पार्कही सध्या वणव्याच्या आगीत धुमसत आहे.

ओडिशातील जंगलांमध्ये 10 दिवसांपासून धुमसती आग, 3000 प्रकारच्या वनस्‍पती धोक्यात
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 12:54 AM

भुवनेश्वर : संपूर्ण देशात उन्हाळ्याची चाहुल लागलीय. तापमानाचा पारा चढण्या सुरुवात झालीय. याच काळात जंगलांना आग लागण्याच्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ झालेली असते. भारतातही अशा घटना वाढताना दिसत आहेत. ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यात सिमलीपाल नॅशनल पार्कही सध्या वणव्याच्या आगीत धुमसत आहे. या राष्ट्रीय उद्यानात मागील 10 दिवसांपासून भयंकर आग लागलीय. अद्यापही ही आग नियंत्रणात आलेली नाही. मात्र, याकडे अनेकांचं दुर्लक्ष झालेलं दिसत आहे (Fire in Simlipal Forest of Odisha Environmentalist concern over situation).

सिमलीपाल जंगल 1060 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेलं देशातील सर्वात महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे. हा भाग मयूरभंज इलेफंट रिझर्व्हचा भाग आहे. या ठिकाणी याशिवाय अग वाघ अभयारण्य देखील आहे. अशा भागात आग लागल्याने पर्यावरण तज्ज्ञांकडून काळजी व्यक्त केली जातेय.

या जंगलात 3000 प्रकारच्या वनस्पती

सिमलीपालचं जंगल बंगाली वाघ, आशियन हत्ती आणि चौशिंगा अशा प्राण्याचा अधिवास आहे. याशिवाय या उद्यानांमध्ये जोरांदा आणि बेरीपानी धबधबे देखील प्रसिद्ध आहेत. 2009 मध्ये युनेस्‍कोकडून या भागाला वर्ल्‍ड नेटवर्क ऑफ बायोस्‍पेयर रिझर्व्ह म्हणून घोषित करण्यात आले.

मागील 10 दिवसांपासून या भागात आग लागलीय. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अटोकाट प्रयत्न केले जात आहेत. इंडियन एक्‍सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार एकूण 399 ठिकाणी आगीचा भडगा उडाल्याचं सध्या समोर आलंय. हे उद्या लाल सिल्‍क कॉटन झाडांसाठी विशेष करुन प्रसिद्ध आहे. या उद्यानाचं नावही या झाडांवरुनच ठेवण्यात आलंय.

सिमलीपालच्या जंगलात 3000 प्रकारच्या वनस्पती आहेत. यात 94 प्रकारच्या प्रजाती एकट्या ऑर्किडच्या आहेत. याशिवाय या राष्ट्रीय उद्यानात पाण आणि जमिनीवर राहू शकणारे 12 प्रकारचे प्राणी आहेत. 29 प्रकारचे सरपटणारे प्राणी, 264 प्रकारचे पक्षी आणि 42 प्रकारचे सस्तन प्राणी आहेत.

आगीवर नियंत्रणासाठी काय प्रयत्न?

या जंगलातील आगीवर नियंत्रणासाठी 1,000 कर्मचारी, 250 फॉरेस्‍ट गार्ड्स काम करत आहेत. 45 टेंडर्स आणि 240 ब्‍लोअर मशिनच्या सहाय्याने आग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नेशनल पार्कच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जंगलाचा मुख्‍य भाग आगीपासून सुरक्षित आहे. त्यामुळे तेथे संरक्षित प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या प्रजातींचं नुकसान झालेलं नाही. ही आग बफर झोनमध्ये लागली होती.

हेही वाचा :

100 कोटींच्या बांबू प्रशिक्षण केंद्राला लागलेल्या आगीची CID चौकशी करा- मुनगंटीवार

VIDEO : साताऱ्यात सहा शिवशाही बसला भीषण आग

मुंबईत आगीच्या दोन घटना… अंधेरीत MIDC कंपनीला आग, मीरा रोडमध्ये गॅस सिलेंडरच्या ट्रकला आग

व्हिडीओ पाहा :

Fire in Simlipal Forest of Odisha Environmentalist concern over situation

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.