नवी दिल्ली : हुशार विद्यार्थ्यांचा कल डॉक्टर, इंजिनीअर होण्याकडे असतो. पदवी प्राप्त केल्यानंतर देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणून युपीएससीकडे पाहिले जाते. त्यानंतर आयएएस, आयपीएससारखी पदं मिळाली की तिथं स्थिरस्थावर होतात. पण, याला फारच कमी विद्यार्थी अपवाद ठरतात. युपीएससीची नोकरी सोडून २८ हजार कोटी रुपयांची कंपनी स्थापन करणाराही एक युवक आहे. ही गोष्ट आहे रोमन सैनी यांची. रोमन यांनी ऑनलाईन लर्निंग प्लॅटफार्म Unacademy ची स्थापना केली. लहानपणापासून त्यांनी मोठ्या गोष्टी केल्यात. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी एआयआयएमएसची प्रवेश प्रक्रिया क्लीअर केली होती. वयाच्या १८ व्या वर्षी प्रतिष्ठित मेडिकल जर्नलसाठी रिसर्च पेपर लिहिला होता.
एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोमन यांची नेशन ड्रग डिपेंडन्ट ट्रीटमेंट सेंटरमध्ये काम केलं. अशा प्रतिष्ठित ठिकाणी नोकरी मिळाल्यानंतर सहसा कोणी सोडत नाही. पण, रोमनच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. त्यांनी सहा महिन्यात नोकरीचा राजीनामा दिला.
एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळालेली नोकरी सहा महिन्यांत सोडली. त्यानंतर रोमन यांनी युपीएससीची तयारी केली. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी युपीएससी क्लीअर केली. मध्य प्रदेशात जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले.
आयएएस झाल्यानंतर रोमन यांनी वेगळा विचार केला. मित्र गौरव मुंजालसह अनअकादमीची स्थापना केली. अनअकादमी ही ऑनलाईन लर्निंग प्लॅटफार्म आहे. हजारो युवक या माध्यमातून युपीएससीची तयारी करतात.
युपीएससीची तयारी करण्यासाठी लाखो रुपये खर्च येते. कमी खर्चात युपीएससीच्या तयारीसाठी ऑनलाईन प्लॅटफार्म तयार करणे हा त्यामागचा उद्देश होता. २०१० ला गौरव गुंजाल यांनी याची सुरुवात युट्यूबवरून केली होती. २०१५ मध्ये रोमन सैनी, गौरव मुंजाल आणि हिमेश सिंह यांनी ऑनलाईन लर्निंगची सुरुवात केली. सध्या या कंपनीची किंमत २८ हजार कोटी रुपये आहे.
रोमन सैनी या तरुणाच्या जिद्दीची ही कहाणी. मन लागत नसेल तर इच्छेप्रमाणे करा. असा संदेश या माध्यमातून रोमन देत आहेत. जे करायचं ते आवडीने करा. मन लावून करा. यश नक्कीच मिळेल. लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचा असल्यानं रोमनला फायदा झाला. ही बाब खरी असली तरी त्याने केलेल्या मेहनतीचं चिज झालंय.