आधी इंजिनिअर, मग आयएएस आणि आता पायलट, मग का नाही होणार चर्चा ?

राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा हा अधिकारी प्रधान सचिव. सर्वसाधारणतः कॅबिनेट दर्जाच्या आयएएस अधिकाऱ्यांचा तामझाम हा इतर अधिकाऱ्यांपेक्षा कणभर अधिकच. कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घेरलेल्या ताफ्यात हे अधिकारी फिरत असतात.

आधी इंजिनिअर, मग आयएएस आणि आता पायलट, मग का नाही होणार चर्चा ?
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 7:18 PM

बिहार : तो एक बडा अधिकारी पण सामान्य व्यक्तीप्रमाणे भाजी आणणे, टपरीवरचा चहा पिणे, रस्त्यावर पाणी पुरी खाणे, कधी कचोरी तर कधी जिलेबी ताव मारताना हा अधिकारी दिसायचा. परंतु, मंत्रालयात त्याचा दरारा कायम असायचा. कारण, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा हा अधिकारी प्रधान सचिव. सर्वसाधारणतः कॅबिनेट दर्जाच्या आयएएस अधिकाऱ्यांचा तामझाम हा इतर अधिकाऱ्यांपेक्षा कणभर अधिकच. कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घेरलेल्या ताफ्यात हे अधिकारी फिरत असतात. परंतु, हा अधिकारी इतका मोठा अधिकारी असूनही सामान्य जनाप्रमाणेच सगळीकडे वावरतो. त्याच्या या साधेपणाची राज्यात चर्चा सुरु असतानाच आणखी एका कारणामुळे हा अधिकारी अधिक चर्चेत आला आहे.

बिहारमधील सर्वात शक्तिशाली आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक असे डॉ. एस. सिद्धार्थ हे मुख्यमंत्री निराश कुमार यांचे प्रधान सचिव आहेत. बिहार केडरचे १९९१ बॅचचे ते आयएएस अधिकारी आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे प्रधान सचिव यासोबतच वित्त आणि कॅबिनेट सचिवालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही ते काम पहातात.

हे सुद्धा वाचा

विमान उड्डाणाचे प्रशिक्षण

दिल्लीच्या आयआयटीमधून त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयात डॉक्टरेट पदवी घेतली आहे. त्यांनतर त्यांनी आयएएसची परीक्षा दिली आणि त्यात ते पासही झाले. बिहार सरकारमध्ये कार्यरत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडत असताना त्यांनी विमान उड्डाणाचे प्रशिक्षण घेतले. हा कोर्सही सिद्धार्थ यांनी यशस्वीपणे पूर्ण केला.

इंजिनिअर, आयएएस आणि पायलट

पायलट झाल्याचे प्रमाणपत्र आणि उड्डाण परवाना डॉ. एस. सिद्धार्थ यांना देण्यात आला आहे. पायलट होण्याचे त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न यामुळे पूर्ण झाले आहे. त्याचे स्वप्न साकार झाले आहे. लहानपणी खेळण्यातील विमाने पाहताना आपल्यालाही असे विमान उडवायला मिळेल या आशेने त्यांनी पायलट होण्याचे ठरवले आणि इंजिनिअर, आयएएस आणि पायलट होऊन त्यांनी आपले ते स्वप्न पूर्ण केले.

पत्नी भारत सरकारच्या कृषी मंत्रालयात सहसचिव

इंजिनिअर, आयएएस आणि पायलट अशी तिहेरी कामगिरी करणारे डॉ. एस. सिद्धार्थ हे बहुदा पहिलेच आयएएस अधिकारी आहेत. पायलट झाल्यानंतर आता ते बहुउद्देशीय रोबोट बनवत आहेत. हा रोबो प्रोग्रामिंगनुसार आणि त्याची गरज कुठे आहे त्यानुसार काम करणारा आहे. डॉ. एस. सिद्धार्थ यांच्या पत्नी देखील आयएएस अधिकारी असून भारत सरकारच्या कृषी मंत्रालयात त्या सहसचिव म्हणून कार्यरत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.