आधी कानपूर, आता आग्रा, दोन बाईकर्सचं भांडण थेट धार्मिक तणावात, तुफान दगडफेक आणि राडा

कानपूर पोलीस आयुक्त विजयसिंह मीणा यांनी पीएफआयच्या कनेक्शनच्या चौकशीची घोषणा केलीय. कारण नेमकं त्याचदिवशी पीएफआयनं मणिपूर आणि पश्चिम बंगाल बंदचं आवाहन केलं होतं.

आधी कानपूर, आता आग्रा, दोन बाईकर्सचं भांडण थेट धार्मिक तणावात, तुफान दगडफेक आणि राडा
कानपूरनंतर आग्र्यातही तुफान दगडफेकीची घटना घडलीय
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 11:03 AM

उत्तर प्रदेशात कानपूरनंतर (UP) आता आग्र्यातही (Agra Religious tension) धार्मिक तणाव निर्माण झालाय. दोन बाईकर्सच्या भांडणाचं रुपांतर थेट धार्मिक तणावात झालंय. कानपूर, (Kanpur) आग्रा ही मोठी शहरं आहेत पण त्यामुळे योगी सरकारची डोकेदुखी वाढलीय. एका सडकचं काम सुरु होतं आणि त्याचवेळेस तिथं दोन बाईकर्सचा टकराव झाला पण बघता बघता त्या भांडणाचं पर्यावसन थेट दंगलीत झालं. तुफान दगडफेक केली गेली. राडा झाला.

नेमकं काय घडलं?

दगडफेकीची ही घटना आग्र्यातल्या बसई गंज खुर्द भागात घडलीय. तिथं एका सडकचं काम सुरु होतं. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात राडारोडा पडला होता. त्याचवेळेस दोन बाईकर्स एकमेकांसमोर आले. त्यांच्या गाडीची हलकिशी टक्कर झाली. त्यातून दोघात भांडण झालं. आजुबाजूनं मग गर्दी जमत गेली. ही गर्दी विभागली गेली. जमलेल्या गर्दीनं मग एकमेकांवर तुफान दगडफेक केली. मोठा राडा झाला. थोड्याच वेळात पोलीस दाखल झाले पण तोपर्यंत घडायचं ते घडून गेलं होतं. दरम्यान कानपूरमध्ये जी दंगल उसळली, त्यातल्या आरोपींची धरपकड सुरुच आहे. आतापर्यंत 29 जणांना अटक केली गेलीय.

14 दिवसांची कोठडी

कानपूर दंगलीचा मुख्य आरोपी हयात जफर हाशमीला रविवारी स्पेशल मॅजिस्ट्रेटसमोर हजर केलं गेलं. तिथं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. पोलीस आज पुन्हा कोर्टासमोर त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत. दरम्यान कानपूरच्या दंगली प्रकरणी आणखी पाच जणांना अटक करण्यात आलीय. आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या ही 29 वर पोहोचलीय. एकूण आरोपींचा आकडा हा 100 च्या वर आहे.

हे सुद्धा वाचा

पुन्हा पीएफआय कनेक्शन

उत्तर प्रदेशात एका मागून एक होणाऱ्या दंगलीत पीएफआयचा हात आहे का याचाही तपास केला जातोय. कानपूर घटनेची चौकशी करण्यासाठी एका एसआयटीची स्थापन करण्यात आलीय. कानपूर पोलीस आयुक्त विजयसिंह मीणा यांनी पीएफआयच्या कनेक्शनच्या चौकशीची घोषणा केलीय. कारण नेमकं त्याचदिवशी पीएफआयनं मणिपूर आणि पश्चिम बंगाल बंदचं आवाहन केलं होतं.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.