आधी ट्वीट, मग भाषण… मोठ्या घोषणांसाठी मोदींची अनोखी स्टाईल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमीप्रमाणे आपल्या अनोख्या स्टाईलने ट्वीट करत देशातील जनतेला मोठी घोषणा करणार असल्याचं सांगितलं. यामुळे थोड्यावेळासाठी देशात गोंधळ उडाला होता. नेमकी मोदी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सकाळी मोदींनी ट्वीट करत म्हटलं होतं की, “थोड्याचवेळात देशासाठी एक महत्वपूर्ण संदेश घेऊन येत आहे”, असा ट्वीट मोदींनी केला. हे […]

आधी ट्वीट, मग भाषण... मोठ्या घोषणांसाठी मोदींची अनोखी स्टाईल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमीप्रमाणे आपल्या अनोख्या स्टाईलने ट्वीट करत देशातील जनतेला मोठी घोषणा करणार असल्याचं सांगितलं. यामुळे थोड्यावेळासाठी देशात गोंधळ उडाला होता. नेमकी मोदी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

सकाळी मोदींनी ट्वीट करत म्हटलं होतं की, “थोड्याचवेळात देशासाठी एक महत्वपूर्ण संदेश घेऊन येत आहे”, असा ट्वीट मोदींनी केला. हे ट्वीट पाहताच नेमकी काय घोषणा करणार यावर चर्चा देशात सुरु झाली होती. कारण याआधीही मोदींनी ट्वीट करत आपल्या अनोख्या स्टाईलने देशातील जनतेला धक्के दिले आहेत.

आधी ट्वीट, मग भाषण आणि त्यानंतर मोदींची मोठी घोषणा, असं समीकरण आता जुळले आहे. याआधीही दोनवेळा मोदींनी ट्वीट करत देशातील मोठी घोषणा केली होती. एक म्हणजे नोटबंदी आणि दुसरी म्हणजे नागा करार या दोन्ही घोषणेमुळे देशात मोठ्या प्रमाणात मोदींच्या नावाची चर्चा सुरु होती.

घोषणा – एक

यापूर्वीही 3 ऑगस्ट 2015 ला भारत सरकारने संदेश पाठवला होता. यामध्ये भारत सरकार एक मोठी घोषणा करणार असल्याचं म्हटंल होतं. हा संदेश पाठवल्यानंतर काही वेळाने भारत सरकार आणि नॅशनल सोशलिस्ट कांउन्सिल ऑफ नागालँड ( ईसाक-मुईवाह) या बंडखोर गटाबरोबरच्या ऐतिहासिक करारावर केंद्र सरकारने स्वाक्षऱ्या केल्या होत्या. नागालँडमधील शांतता प्रक्रियेसाठी केंद्राचे हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते.

या करारानंतर नागा लोकांना मोदींचे स्वागत केले. तसेच देशातील इतर ठिकाणीही मोदींच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. लोकांना वाटले नागालँडमध्ये अनेक वर्षापासून सुरु असलेला संघर्ष आता मिटू शकतो.

घोषणा – दोन

नोटबंदी दरम्यानही भारत सरकारतर्फे संदेश पाठवण्यात आला होता की, थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी एक मोठी घोषणा करणार आहेत. यानंतर 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या. या निर्णयामुळे देशात गोंधळ उडाला होता.

घोषणा – तीन

अवकाशातील शत्रूचा सॅटॅलाईट अवघ्या काही क्षणात उध्वस्त करु शकू असं अँटी सॅटेलाईट मिसाईल भारतीय वैज्ञानिकांनी तयार केलं आहे. याची चाचणी आज पार पडली. अवघ्या तीन मिनिटात आपल्या या मिसाईलन तीनशे किलोमीटरवरील आपलं लक्ष्य साधलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची माहिती थेट प्रक्षेपणाद्वारे देशवासीयांना दिली. अंतराळातील अशक्यप्राय सॅटेलाईट पाडणारा भारत केवळ चौथा देश ठरला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.