Rajsthan : एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या, विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू, पोलिसही हैराण

नेक वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी संध्याकाळपासून 3 सख्ख्या बहिणींसह त्यांची दोन मुले बेपत्ता होते.

Rajsthan : एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या, विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू, पोलिसही हैराण
माजी मंत्री डीपी सावंतांच्या घरी बंदुकधारी घुसलाImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 2:55 PM

राजस्थान – राजस्थानची (Rajsthan) राजधानी जयपूरमध्ये (Jaipur) एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह सापडल्याने परिसरात घबराहट पसरली आहे. ही घटना जयपूरच्या दुडू शहरात घडली आहे. पोलिसांकडे (police) प्रात्प झालेल्या माहितीनुसार सासरच्या लोकांनी हुंड्याच्या लालसेपोटी तीन महिला आणि दोन मुलांची हत्या केली आहे. पोलिसांनी लोकांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा राजस्थान पोलिस कसून चौकशी करणार आहे. मोठी घटना घडली असल्याने पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात ज्या तीन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. त्यातल्या दोन गर्भवती होत्या.

कालू देवीच्या दोन्ही बहिणी गरोदर होत्या

सासरच्या लोकांनी हुंड्याच्या लालसेपोटी तिन्ही महिला आणि दोन मुलांची हत्या केली आहे. मृत्यांमध्ये एक कालुदेवी आणि तिच्या दोन बहिणींचा समावेश आहे. कालू देवी यांच्या दोन मुलांचे मृतदेहही सापडले आहेत. एक चार वर्षाचा आहे, तर दुसरा 27 दिवसांचा आहे. कालू देवीच्या दोन बहिणींचे मृतदेह देखील दोन किलोमीटरवरती असलेल्या विहिरीत मिळाले आहेत. कालू देवीच्या दोन्ही बहिणी गरोदर होत्या आणि त्या कधीही मुलाला जन्म देऊ शकतात. एकाच वेळी पाच मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसही हैराण…

अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी संध्याकाळपासून 3 सख्ख्या बहिणींसह त्यांची दोन मुले बेपत्ता होते. अचानक मृतदेह सापडल्याने अख्खं गाव हादरून गेलं आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पंधरा दिवसांपूर्वी मोठ्या बहिणीला मारहाण केल्याने तिच्या डोळ्याला दुखापत झाली होती.

हे सुद्धा वाचा

ती रूग्णालयातून परत आल्यानंतर सुध्दा सासरच्यांकडून सतत हुंड्याची मागणी होत होती.

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....