नरेंद्र मोदी यांनी निवडणूकीचे बिगुल बुलंदशहरातूनच का वाजविले, पाच मोठी कारणे पाहा ?

बुलंदशहरातील भाषणात मोदी यांनी विरोधी पक्षांवर टीका केली. देशातील एका मोठा भाग विकासापासून वंचित राहीला आहे. त्यात उत्तर प्रदेशाचा समावेश आहे. सर्वात जास्त लोकसंख्येच्या या भागाकडे दुर्लक्ष झाले आहे. अनेक वर्षापासून येथील सरकार चालविणाऱ्यांनी केवळ शासक म्हणून काम केले अशी टीका त्यांनी केली आहे.

नरेंद्र मोदी यांनी निवडणूकीचे बिगुल बुलंदशहरातूनच का वाजविले, पाच मोठी कारणे पाहा ?
pm modi bulandshar Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 6:27 PM

नवी दिल्ली | 25 जानेवारी 2024 : अयोध्या राम मंदिरातील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पश्चिमी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून लोकसभा 2024 चा प्रचारस सुरुवात केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी 19,100 कोटी रुपयांच्या योजना जाहीर केल्या. मोदी यांनी आपल्या भाषणात राम मंदिराची उभारणीपासून ते माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची देखील आठवण काढली. प्रचाराचा शुभारंभ करण्यास बुलंदशहराची निवड करण्यामागे पाच मोठी कारणे सांगितली जात आहेत.

कल्याण सिंह यांचा बालेकिल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा 2024 निवडणूकांचा प्रचार पश्चिम उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातून करण्यामागे अनेक कारणे आहेत. हा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचा बालेकिल्ला राहीला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याण सिंह यांचा उल्लेख करताना राम मंदिराचा उल्लेख केला. राम मंदिराने देशात निर्माण झालेल्या वातावरणाचा भाजपाला फायदा उठवायचा आहे. बुलंद शहराच्या सिंकदराबाद येथून निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा करण्यामागे प्रमुख कारण या विभागाला उत्तर प्रदेशाच्या विकासाचा चेहरा मानले जाते.

जाट आणि गुर्जर लोकसंख्या

राम मंदिराच्या निर्मितीमुळे पूर्व उत्तर प्रदेशात भाजपाला जिंकण्याचा संपूर्ण आत्मविश्वास आहे. गोरखपूर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बाले किल्ला मानला जातो. तर वाराणसी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ आहे. भाजपा पूर्व उत्तर प्रदेशात मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे भाजपा पश्चिमी युपीमध्ये कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नाही. पश्चिमी उत्तर प्रदेशला जाट आणि गुर्जर बहुल क्षेत्र मानले जाते. येथे 17 टक्के मतदार जाट आहेत तर 16 टक्के गुर्जर आहेत.

2014 मध्ये भाजपाला सर्व जागा मिळाल्या

जाट हे रालोदचे परंपरागत मतदार मानले जातात. समाजवादी पार्टी यावेळी राष्ट्रीय लोकदलाशी युती केली आहे. त्यामुळे सपा आणि रालोद यांच्या युतीची धार कमी करण्यासाठी भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंकदराबाद येथील सभेने लोकसभा 2024 च्या प्रचाराची सुरुवात मुद्दामहून केली आहे. नरेंद्र मोदी यांनी माता वैष्णोदेवीचे दर्शन केल्यानंतर साल 2014 मध्ये लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात बुलंदशहरातून केली होती आणि भाजपाने सर्व 14 जागांवर विजय मिळविला होता.

मोदींसाठी लकी बुलंदशहर

बुलंदशहरातून प्रचार सुरु करण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे मोदींसाठी हे शहर लकी आहे. साल 2014 च्या लोकसभा निवडणूकीसाठी बुलंदशहरातून सुरुवात शुभ ठरली होती. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर साल 2014 मध्ये मोदींना मोठा विजय मिळाला मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.