श्रीनगर : मागच्या काही दिवसांपासून शांत असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेकी कारवाया सुरु करण्याचा प्रयत्न आहे. अतिरेक्यांचे नापाक मनसुबे उधळून लावण्यासाठी भारतीय लष्करही तितकच सज्ज आहे. दहशतवादी कारवाया करण्याच्या इराद्याने भारतीय भूमीत घुसलेल्या नापाक दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने आज चांगलाच धडा शिकवला. जम्मू-काश्मीरमध्ये आज भारतीय सैन्यान मोठं ऑपरेशन केलं. दहशत माजवण्यासाठी आलेल्या अतिरेक्यांचा खात्मा केला.
जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय सैन्याने मिळून हे ऑपरेशन केलं. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा पथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.
किती दहशतवादी ठार झाले?
दोघांनी मिळून केलेल्या या ऑपरेशनमध्ये पाच परदेशी अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. सध्या चकमक स्थळी शोध मोहिम सुरु आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. “पाच परदेशी दहशतवादी या ऑपरेशनमध्ये ठार झाले. शोध मोहित सुरु आहे” असं काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी एएनआयला सांगितलं.
#KupwaraEncounterUpdate: Five (05) foreign #terrorists killed in #encounter. Search in the area is going on: ADGP Kashmir@JmuKmrPolice https://t.co/h6aOuTuSj0
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) June 16, 2023
स्पेशल टीप मिळालेली
उत्तर काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळच्या जुमागंड भागात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षा पथकांनी ऑपरेशन सुरु केले. त्यावेळी चकमक सुरु झाली. स्पेशल टीप मिळाली होती, त्या आधारावर ही कारवाई करण्यात आली.
An #encounter has started between #terrorists and joint parties of Army & Police on a specific input of Kupwara Police in Jumagund area of LoC of #Kupwara district. Further details shall follow.@JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) June 15, 2023
याआधी किती दहशतवाद्यांचा खात्मा ?
13 जूनला तीन दिवसांपूर्वीच कुपवाड्यात एलओसीजवळ सुरक्षा पथकांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, असं पोलिसांनी सांगितलं. दोबानर माच्चल भागात ही चकमक झाली होती. याआधी 2 जून रोजी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात एक दहशतवाद्याला एन्काऊंटरमध्ये सुरक्षा पथकांनी कंठस्नान घातलं होतं.