मुंबई ते गोवा वंदेभारतसह पाच वंदेभारतचे उद्या उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटने लोकार्पण

| Updated on: Jun 26, 2023 | 4:55 PM

देशाला पाच नवीन वंदेभारतचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मध्य प्रदेशातील राणी कमलापती रेल्वे स्थानकातून होणार आहे.

मुंबई ते गोवा वंदेभारतसह पाच वंदेभारतचे उद्या उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटने लोकार्पण
mumbai vande express narendra modi
Follow us on

मुंबई : मुंबई ते गोवा ( मडगांव ) वंदेभारत एक्सप्रेसला ( VandeBharat Express ) एकदाचा मुहूर्त मिळाला आहे. उद्या मध्य प्रदेशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या हस्ते पाच वंदेभारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. मुंबई ते गोवा वंदेभारतचे नियोजित उद्घाटन 3 जून रोजी होणार होते. परंतू 2 जून रोजी ओदिशातील बालासोर ( Balasore Train Accident )  जिल्ह्यात देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात अपघात घडून प्रचंड मनुष्यहानी झाल्याने दुखवटा जाहीर झाल्याने हे उद्घाटन रद्द करण्यात आले होते.

वंदेभारतची संख्या 23 होणार

देशाला पाच नवीन वंदेभारतचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मध्य प्रदेशातील राणी कमलापती रेल्वे स्थानकातून होणार आहे. राणी कमलापती ( भोपाळ ) – जबलपूर वंदेभारत एक्सप्रेस, खजुराहो-भोपाळ-इंदौर वंदेभारत एक्सप्रेस, मडगांव ( गोवा ) – मुंबई सीएसएमटी वंदेभारत एक्सप्रेस, धारवाड-बंगळुरु वंदेभारत एक्सप्रेस आणि हटीया-पाटणा वंदेभारत एक्सप्रेस अशा पाच वंदेभारतचे एकाच वेळी लोकार्पण केले जाणार आहे. त्यामुळे देशातील एकूण वंदेभारतची संख्या त्यामुळे 23  इतकी होणार आहे.

1 – सीएसएमटी – मडगांव ( गोवा ) वंदेभारत एक्सप्रेस : ही गोव्याला मिळालेली पहिली वंदेभारत एक्सप्रेस असून तिचे सीएसएमटी ते मडगाव दरम्यान ती धावणार आहे, ही वंदेभारत सोळा डब्यांच्या आठ डब्यांद्वारे चालविण्यात येणार आहे. या गाडीला एक्झुकेटीव्ह क्लाससाठी 2,915 रुपये तर चेअरकारसाठी 1,435 रुपये भाडे असणार आहे.

मुंबई ते गोवा वंदेभारत मॉन्सून वेळापत्रकामुळे 10 तासांचा वेळ घेणार आहे. आठ डब्यांच्या या गाडीला 11 थांबे असून एरव्ही मुंबई ते गोवा हे ( 586 कि.मी.) अंतर ती सात तास पंधरा मिनिटांत कापणार आहे.

मान्सूनकाळात ती आठवड्यातून तीन वेळा सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी धावणार आहे. सीएसएमटी हून स.5.23 वाजता सुटून ती मडगांवला दु. 3.30 वाजता पोहचेल. 28 जूनपासून ती प्रवाशांच्या सेवेत येईल. तिला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम असे थांबे आहेत.

ही ट्रेन नॉन मान्सूनमध्ये शुक्रवार वगळता आठवड्यातून सहा दिवस चालविण्यात येणार आहे. या मार्गावरील अन्य ट्रेनपेक्षा या ट्रेन प्रवाशांच्या एका तासांची बचत होणार आहे. ही गाडीचे 2 जूनचे पूर्वनियोजित उद्घाटन ओदिशा रेल्वे अपघाताने रद्द करण्यात आले होते. ते आता उद्या अन्य ट्रेन सोबत एकाच व्यासपीठावरुन करण्यात येणार आहे.

2 – राणी कमलापती ( भोपाळ ) : जबलपूर वंदेभारत एक्सप्रेस : ही सेमी हायस्पीड ट्रेन मध्य प्रदेशातील महाकौशल प्रातांला ( जबलपूर ) ते मध्य रिजनला ( भोपाळ ) जोडली जाणार आहे. ही मध्य प्रदेशला मिळालेली दुसरी वंदेभारत आहे. दोन शहरांना ही दरताशी 130 वेगाने जोडली जाणार आहे. या मार्गावरील याआधीच्या तेज गाडीपेक्षा वंदेभारतने अर्धा तासांची बचत होणार आहे.

3 – खजुराहो-भोपाळ-इंदौर वंदेभारत एक्सप्रेस : ही मध्य प्रदेशला मिळालेली तिसरी वंदेभारत आहे. ही ट्रेन मालवा ( रिजन ) , बुंदेलखंड रिजन ( खजुराहो ) आणि सेंट्रल रिजन ( भोपाळ ) या भागात धावेल. महाकालेश्वर, मंडू, महेश्वर, खजुराहो, पन्ना आदी प्रेक्षणीय स्थळांना भेटणाऱ्या पर्यटकांना या ट्रेनचा फायदा होणार आहे. ही ट्रेन आधीच्या या मार्गावरील ट्रेनपेक्षा अडीच तासांची बचत करणार आहे.

4 – धारवाड-बंगळुरु वंदेभारत : कर्नाटकला आणखी एक वंदेभारत मिळणार आहे. ही ट्रेन धारवाड, हुब्बाळी आणि दवणगेरे यांना राजधानी बंगळुरुला जोडणार आहे. याआधीच्या या मार्गावरील ट्रेनपेक्षा तीस मिनिटांची बचत होईल. याआधीची कर्नाटकची वंदेभारत चेन्नई-बंगळुर आणि म्हैसूर दरम्यान धावत आहे.

5 – हटीया-पाटणा वंदेभारत एक्सप्रेस : बिहारला मिळालेली ही पहिली वंदेभारत एक्सप्रेस आहे. या सेमी हायस्पीड वंदेभारतचा मार्ग व्हाया तटीसिलवई, मेर्सा, शांकी, बाहकाकनास, हजारीबाग, कोडर्मा आणि गया मार्गाने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांची एक तास 25 मिनिटांची बचत होणार आहे.