पाणी आलं आणि प्रेतं वाहू लागली… नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण; ‘या’ ठिकाणच्या घटनेने सर्वच हादरले
राजस्थानच्या जयपूर येथे अतिवृष्टीने कालवा फुटल्याने एकच पळापळ झाली . रविवारी रात्र येथील बांध फुटून पाणी स्मशानात शिरल्याने गावकरी मेठाकुठीला आले. अखेर पोलिसांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले.
राजस्थानची राजधानी जयपुरमध्ये नूर कालवा फुटल्याने पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गावातील अनेक घरात पाणी शिरले आहे. खोनागोरिया परिसरातील एक स्मशानाला पाण्याने वेढले. कब्रस्थानात पाणी साचल्याने प्रेतं वर येऊन पाण्यात तरंगत वाहू लागली. त्यामुळे काही गावकऱ्यांना या प्रेतांना कसेतरी एका जागी जमा केले. दुसरीकडे या ठिकाणी पोलिस आणि बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
जयपूरात रविवारी रात्री अतिवृष्टी सुरु झाल्याने खोनागोरिया ठाणे क्षेत्राक कालव्याचा बांध फुटल्याने अनेक घरे पाण्याखाली बुडाली आहेत. येथील एका स्मशान भुमीतील प्रेतं बाहेर वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यांनंतर गावकऱ्यांनी प्रेतांना एकत्र करुन जमा करुन ठेवले. सकाळी साडे नऊ च्या सुमारास हा बांध फुटल्याने गावकऱ्यांची पळापळ झाली.
प्रेतं कालव्यात वाहू लागली
कालव्याच्या बाजूला एक कब्रस्तान असल्याने त्यात भरपूर पाणी भरले त्यामुळे प्रेत अक्षरश: जमीनीतूनवर आली आणि नाल्यातून वाहू लागली. त्यानंतर लोकांनी एकत्र येत प्रेतं एकत्र जमा एका बाजूला जमा करुन सुरक्षित ठिकाणी ठेवली. खोनागोरिया पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या सहाय्याने मदत कार्य सुरु केले असून या कालव्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत तरी कोणत्याही जीवत हानीचे वृत्त नसल्याने सांगण्यात येत आहे.