Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lalu Prasad Yadav : चारा घोटाळा प्रकरण : लालू प्रसाद यादवांसह इतर 37 जणांच्या शिक्षेचा उद्या फैसला

लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांची रिम्स रुग्णालयात रवानगी करण्यात आली होती. सोमवारच्या शिक्षेच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर लालूंसाठी रिम्स रुग्णालयातील पेइंग वॉर्डमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षेची सुनावणी सोमवारी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे.

Lalu Prasad Yadav : चारा घोटाळा प्रकरण : लालू प्रसाद यादवांसह इतर 37 जणांच्या शिक्षेचा उद्या फैसला
लालूंच्या अडचणीत पुन्हा मोठी भर; जामीनावर सुप्रीम कोर्ट करणार सुनावणीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 7:13 PM

रांची : देशभर गाजलेल्या चारा घोटाळ्याशी संबंधित पाचव्या गुन्ह्यात सीबीआयचे विशेष न्यायालय सोमवारी राष्ट्रीय जनता दलचे (RJD) प्रमुख लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) व इतर 37 आरोपींच्या शिक्षेचा निर्णय देणार आहे. डोरंडा कोषागारातून पैसे काढल्याच्या प्रकरणात लालूंसह एकूण 75 जणांना न्यायालयाने गेल्या आठवड्यात (15 फेब्रुवारी) दोषी ठरवले आहे. त्यातील 35 दोषींना प्रत्येकी तीन वर्षांचा तुरुंगवास सुनावला होता, तर लालू व इतर 37 दोषींना सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. (Fodder scam case: Lalu Prasad Yadav and 37 others sentenced tomorrow)

लालूंसाठी रिम्सच्या पेइंग वॉर्डमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था

विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशी हे शिक्षा जाहीर करणार आहेत. यासंदर्भातील न्यायालयातील संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची तयारी पूर्ण केली आहे. लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांची रिम्स रुग्णालयात रवानगी करण्यात आली होती. सोमवारच्या शिक्षेच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर लालूंसाठी रिम्स रुग्णालयातील पेइंग वॉर्डमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षेची सुनावणी सोमवारी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. कारागृह प्रशासनाकडून पेइंग वॉर्डमध्ये लालूंसाठी लॅपटॉप पोहोचवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तसेच इतर आरोपींसाठीही होटवार कारागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व दोषी मोठ्या एलईडी स्क्रीनवर त्यांचा निकाल ऐकू शकणार आहेत.

35 दोषींना प्रत्येकी तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड

डोरंडा कोषागारातून अवैधरित्या 139.35 कोटी रुपये काढले गेले होते. लालूंना जर तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाली तर त्यांची पुन्हा तुरुंगात रवानगी होणार आहे. या प्रकरणात न्यायालयाने 15 फेब्रुवारीला ज्या 35 दोषींना प्रत्येकी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, त्यात माजी खासदार जगदीश शर्मा, पब्लिक अकाऊंट्स कमिटीचे तत्कालीन चेअरमन ध्रुव भगत यांचा समावेश आहे. त्यांना तीनपेक्षा कमी वर्षांची शिक्षा झाल्यामुळे जामीनासाठी अर्ज करता येणार आहे. न्यायालयाने त्यांना 20 हजार ते 2 लाखांपर्यंतच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

बहुचर्चित डोरंडा कोषागार प्रकरण नेमके काय आहे?

1996 साली तब्बल 950 कोटी रुपयांचा चारा घोटाळा उघडकीस आला आणि संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. 1990 ते 1995 या कालावधीत हा घोटाळा घडला होता. या संबंधित पाच प्रकरणांमध्ये डोरंडा कोषागारचा घोटाळाचा हा सर्वात मोठा घोटाळा आहे. अन्य चार प्रकरणांत चाईबासा कोषागारातून एकावेळी 37.7 कोटी रुपये आणि दुसर्‍या वेळी 33.13 कोटी रुपये काढण्यात आले होते. तसेच देवघर कोषागारातून 89.27 कोटी रुपये आणि दुमका कोषागारातून 36 कोटी रुपयांची रक्कम अवैधरित्या काढण्यात आली होती. लालूप्रसाद यादव हे बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन विभागातील निधीचा गैरव्यवहार उघडकीस आला होता. (Fodder scam case: Lalu Prasad Yadav and 37 others sentenced tomorrow)

इतर बातम्या

Shweta Mahale : भाजप आमदार श्वेता महालेंसह अनेकांवर गुन्हे दाखल, विनापरवानगी मोटारसायकल रँली काढल्याप्रकरणी कारवाई

Kalyan Crime : कल्याणमध्ये दोन तरुणांनी हातात तलवारी नाचविल्याचा व्हिडिओ व्हायरल

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.