दिवाळीला मोदी सरकारला मोठं ‘गिफ्ट’, परकीय चलन साठ्याचा नवा विक्रम

मोदी सरकारच्या कार्यकाळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही परकीय चलना साठ्यात कमालीचा वेग पहायला मिळाला आहे.

दिवाळीला मोदी सरकारला मोठं 'गिफ्ट', परकीय चलन साठ्याचा नवा विक्रम
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 12:59 AM

नवी दिल्ली : देशाच्या परकीय चलन साठ्याने (FCA) नवा विक्रम केलाय. मोदी सरकारच्या कार्यकाळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही परकीय चलना साठ्यात कमालीचा वेग पहायला मिळाला आहे. आता दिवाळीच्या आधीच्या आठवड्यातही हा परकीय चलन साठा वाढण्यात मोठं यश मिळालं आहे. 6 नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन साठ्यानं 568.49 अब्ज डॉलरचा नवा विक्रम केला (Forex reserve set new record on Diwali week).

परदेशी चलन वाढ हेच परकीय चलन साठ्यातील वेगवान हालचालींचं कारण असल्याचं सांगितलं जातंय. परकीय चलन हा परकीय चलन भांडाराचा मुख्य भाग असतो. भारतीय रिझर्व बँकेकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार या काळात परकीय चलन साठ्यात 6.403 अब्ज डॉलरची वाढ होऊन हा साठा 524.742 अब्ज डॉलरपर्यंत पोहचला आहे. एफसीए डॉलरमध्ये मोजला जातो. मात्र, यात युरो, पाऊंड आणि येनसारख्या इतर परदेशी चलनांचा देखील समावेश असतो.

सोन्याच्या साठ्यातही वाढ

6 नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार देशाच्या साने साठ्यातही मोठी वाढ झाली आहे. या काळात सोन्याच्या साठ्यात 1.328 अब्ज डॉलरने वाढून 37.587 अब्ज डॉलर झाला. दरम्यानच्या काळात देशाचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीजवळील चलनसाठा 4 कोटी डॉलरने वाढून 4.676 अब्ज डॉलरपर्यंत पोहचला आहे.

आयातीतही मोठी वाढ

कोणत्याही देशाचा परकीय चलन साठा वाढणं अर्थव्यवस्थेसाठी चांगलं असतं. जगातील बहुतेक व्यापार व्यवहार हे डॉलरमध्ये होतात. देशाच्या परकीय चलन साठ्यातील वाढीमुळे आता देशाची आयात क्षमता देखील वाढली आहे.

संबंधित बातम्या :

Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगची वेळ काय आणि कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी; जाणून घ्या…

धनत्रयोदशीला देशात तब्बल 40 टन सोन्याची विक्री, 20 हजार कोटी रुपयांची उलाढाल

पुण्यात सोनं खरेदीसाठी झुंबड, धनत्रयोदशीला सोन्याचे दर किती?

Forex reserve set new record on Diwali week

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.