काँग्रेसने हाकललं, भाजपने स्वागत केलं…!

आसाम काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. माजी मंत्री आणि सध्याच्या आमदार अजंता निओग यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.

काँग्रेसने हाकललं, भाजपने स्वागत केलं...!
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 7:19 AM

गुवाहटी : आसाम काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. माजी मंत्री आणि सध्याच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार अजंता निओग यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आसाम विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काँग्रेस पक्षाला हा मोठा झटका मानण्यात येतोय. (Former Assam minister And Congress leader Ajanta Neog met Amit Shah join bjp)

माजी मंत्री आणि सध्याच्या आमदार अजंता निओग यांची काँग्रेस पक्षाने पक्षविरोधी कारवाया केल्याने शुक्रवारी पक्षातून हकालपट्टी केली होती. याचसोबत निओग यांना पक्षातर्फे कारणे दाखवा नोटीस देखील पाठवण्यात आली होती. या सगळ्या प्रकारानंतर निओग यांनी काँग्रस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तात्काळ आपल्या काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

येत्या एक ते दोन दिवसांत आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं एएनआयशी बोलताना निओग यांनी सांगितलं आहे. तसंच निओग यांनी गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली आहे. निओग यांच्याबरोबर आणखी काँग्रेस आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी निओग यांनी आसामचे मुख्यमंत्री सोनोवाल यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तब्बल एक तासापेक्षा अधिक काळ उभयतांमध्ये चर्चा रंगली. त्यानंतर निओग यांनी नॉर्थ इस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सचे हिमांता बिस्वा शर्मा यांचीही भेट घेतली होती. याच कारणामुळे पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेऊन काँग्रेसने निओग यांची काँग्रेस पक्षाने हकालपट्टी केली. (Former Assam minister And Congress leader Ajanta Neog met Amit Shah join bjp)

हे ही वाचा

नरेंद्र मोदींचे भाषण ऐकणाऱ्या कार्यकर्त्यांवर पंजाब सरकारचा लाठीचार्ज, भाजप खासदाराचा आरोप

ईडी येताच खडसे ‘सीडी’वर नंतर बोलणार?

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.