Breaking | काँग्रेसला मोठा झटका, माजी मुख्यमंत्र्यांचा भाजप प्रवेश

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसला लागलेली गळती सुरुच आहे. काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याने 'हात' सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Breaking | काँग्रेसला मोठा झटका, माजी मुख्यमंत्र्यांचा भाजप प्रवेश
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 4:01 PM

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीला मोजून एक वर्ष राहिला आहे. या निवडणुकांना अजून बराच वेळ आहे. तर दुसऱ्या बाजूला कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजलंय. महाराष्ट्रात गेल्या काही महिनांपूर्वी राजकीय सत्तांतर झालं. त्यामुळे प्रत्येक राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राजकीय नेत्यांची भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु आहे. त्यामुळे भाजपची ताकद ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी आगामी लोकसभा निवडणुकीआधी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असा दावा शिरसाठ यांनी केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती.

तर दुसऱ्या बाजूला माजी मुख्यमंत्री राहिलेल्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. आंध्र प्रदेशमध्ये भाजपने काँग्रेसला कुरघोडी केली आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

किरण कुमार रेड्डी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजप राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह, भाजपचे मुख्य प्रवक्ते अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाची शपथ घेतली. किरण कुमार रेड्डी यांनी मार्च महिन्यात काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. किरण कुमार रेड्डी यांनी संयुक्त आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री म्हणून कारभार पाहिला होता.

प्रल्हाद जोशी काय म्हणाले?

“किरण कुमार रेड्डी यांचे कुटुंबिय हे काँग्रेसमध्ये होते. आम्ही आधी भेटलो. तेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे ते प्रभावित आहे, असं किरण कुमार रेड्डी यांनी मला सांगितलं. किरण रेड्डी यांनी मोठी झेप घेत भाजपमध्ये प्रवेश करत आहेत”, असं प्रल्हाद जोशी या वेळेस म्हणाले.

“किरण कुमार रेड्डी हे भ्रष्टाचार विरोधातील लढ्याला आणखी बळ देतील, कारण त्यांची आमदार आणि मंत्री म्हणून स्वच्छ प्रतिमा राहिली आहे. आंधप्रदेशमध्ये रेड्डी यांच्यामुळे भाजपची ताकद आणखी वाढेल” असा विश्वास जोशी यांनी यावेळेस व्यक्त केला.

मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ

रेड्डी यांनी 25 नोव्हेंबर 2010 ते 1 मार्च दरम्यान अविभाजित आंध्र प्रदेशचे 16 वे मुख्ममंत्री म्हणून राज्यकारभार पाहिला. तेलंगाणा राज्याची निर्मिति 2 जून 2014 रोजी झाली. तेलंगाणाची निर्मिती होण्याआधीचे ते संयुक्त आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री होते.

काँग्रेसचा ‘हात’ सोडण्याचं कारण

तत्कालीन यूपीए सरकराने आंध्र प्रदेश विभाजित करुन तेलंगाणा राज्य निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. किरण कुमार यांनी या निर्णयाविरुद्ध काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.