Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंजाबचे माजी मुख्यमंत्रीही भाजपमध्ये; पक्षच भाजपात विलीन…

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर

पंजाबचे माजी मुख्यमंत्रीही भाजपमध्ये; पक्षच भाजपात विलीन...
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 7:07 PM

चंदीगडः पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Former Chief Minister Captain Amarinder Singh) यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच कॅप्टन अमरिंदर यांनी पंजाब लोक काँग्रेस (PLC) हा त्यांचा पक्षही भारतीय जनता पक्षात विलीन केला आहे. आज नरेंद्र सिंह तोमर आणि किरेन रिजिजू या मंत्र्यांकडून त्यांना भाजपचे सदस्यत्व मिळवून देण्यात आले आहे. अमरिंदर यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारीही भाजपमध्ये (BJP) दाखल झाल्याने आता पंजाबच्या राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या समर्थकांशी चर्चा केली असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये पंजाबचे भविष्य पाहायचे असेल तर भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असंही सांगण्यात आले आहे. आमची आणि भाजपची विचारधारा एकच असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसपासून फारकत घेतली होती. त्यानंतर त्यांनी 2022 च्या निवडणुकीसाठी पीएलसी पक्षाची स्थापना करुन आणि नंतर भाजपसोबत एकत्र निवडणूक लढवली होती. त्यानंतर आपने पंजाबमध्ये मारलेल्या मुसंडीत भाजप आणि अमरिंदर सिंग हे दोघंही चितपट झाले होते.

पंजाबमध्ये अकाली दलात फूट पडल्यानंतर भाजपला पंजाबमध्ये एक तगडा शीख उमेदवार पाहिजे होता. त्याच शोधात भाजप होते. त्यामुळे पंजाबमध्ये भाजपला एक नवसंजीवनी मिळणार असल्याचे सांगण्यात येत होते. भाजपच्या या सूत्रात कॅप्टन अमरिंदर सिंग हे एकदम फिट बसतात. त्यांच्यामुळे पंजाबमधील शीख आणि हिंदू दोन्ही समुदायांवर पकड राहणार आहे.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.