“सरकारमध्ये कोणाचा ताळमेळ कोणाला दिसत नाही”; सत्ताधाऱ्यांवर काँग्रेसच्या दिग्गज नेत्याची सडकून टीका

राज्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न खाली गेले असल्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून दंग्यांच्या घटना घडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.

सरकारमध्ये कोणाचा ताळमेळ कोणाला दिसत नाही; सत्ताधाऱ्यांवर काँग्रेसच्या दिग्गज नेत्याची सडकून टीका
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 4:08 PM

मुंबई : राज्यातील शिवसेना-भाजपच्या सरकारची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. जाहिरातीचा खर्च आणि वर्चस्ववादावरून विरोधकांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी गटाने सडकून टीका केली होती. महाविकास आघाडीने सरकारवर टीका करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. तर आताही त्याच जाहिरातीच्या प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हे सरकार जाहिरातीमध्ये मश्गुल असल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच या सरकारचा कारभारही समाधानकारक नसल्याचे सांगत शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये कोणाचा ताळमेळ कोणाला दिसत नाही अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांच्या त्यांच्यामध्ये ताळमेळ नसल्यामुळेच राज्यात आता कायदा सुव्यवस्थेच्या घटना घडताना दिसत आहेत.

राज्यात अनेक वेळा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून राज्यात सरकार आहे की नाही अशीच परिस्थिती असल्याची गंभीर टीकाही त्यांनी यावेळी केली.

मंत्रिमंडळ विस्तार नाही

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांमी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बोलताना म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकार हे काही मंत्रिमंडळ विस्तार करत नाहीत. कारण की, त्यांना माहिती आहे की जर मंत्रिमंडळ विस्तार केला गेला तर हे सरकार पडल्याशिवाय राहणार नाही असा टोलाही त्यांनी या सरकारला लगावला आहे.

जोरदार फिल्डिंग

आगामी निवडणुकीसाठी आतापासूनच जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. त्यामुळे जागा वाटपावरूनही तू तू मैं मै सुरु आहे. त्यावरूनही पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवेसना-भाजपवर टीका केली आहे. कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी प्रत्येक जागेवरती दावा केलेला दाखवायला मिळतो.

महाविकास आघाडीत संगनमत

पण महाविकास आघाडी ही संगमताने एकत्र येऊन भाजपला आव्हान देईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. आणि जागावाटप त्या पद्धतीने होईल अशी मला अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीमुळे महाराष्ट्रातील चित्र आपल्याला बदललेलं पाहायला मिळेल असा विश्वासही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

कर्जच्या व्याजावरचा डोंगर

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मणिपूरसारख्या घटनेवर पंतप्रधान काही बोलत नाहीत. तर कर्जच्या व्याजावरचा डोंगर वाढला आहे तर आर्थिक विकास कसा होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न खाली गेले असल्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून दंग्यांच्या घटना घडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.