हरयाणाचे (Hariyana) माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला (Om Prakash Chautala) यांना चार वर्षांची शिक्षा ठोठाण्यात आलीय. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमलवल्याचा गुन्हा सिद्ध झाला होता. त्यानंतर त्यांना ही शिक्षा देण्यात आलीय. शिक्षा सुनावल्यानंतर कोर्टातच ओम प्रकाश चौटाला यांना ताब्यात घेण्यात (Om Prakash Chautala in Cutody) आलं. ओम प्रकाश चौटाला यांना 50 लाख रुपयांचा दंडही ठोठावलाय. एवढंच नाही तर चौटाला यांच्या चार संपत्तीही जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यात पंचकुला, गुरुग्राम, हेली रोड इथल्या प्रॉपर्टीजचा समावेश आहे.
ओम प्रकाश चौटाला हे सात वेळा आमदार राहिले असून त्यांनी चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलंय. 2 डिसेंबर 1989 पासून 22 मे 1990, 12 जुलै 1990 ते 17 जुलै 1990, 22 मार्च 1991 ते 6 एप्रिल 1991 आणि 24 जुलै 1995 पासून 2005 पर्यंत ते मुख्यमंत्री होती. ओम प्रकाश चौटाला यांचे वडील जनता दल सरकारमध्ये उपपंतप्रधान होते. वडिलांनंतर ओम प्रकाश चौटाला पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर त्यांना पोटनिवडणुकांनाही सामोरं जावं लागलं होतं. एकूण तीन वेळा ओम प्रकाश चौटाला पोटनिवडणूक लढले होते.
1996 साली के एन सैकिया आयोगानं चौटाला यांना आमीर सिंह हत्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. त्यांच्याऐवजी तेव्हा बनारसी दास यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं. पण त्यानंतर दोनच महिन्यात चौटाला पुन्हा मुख्यमंत्री बनले. त्यानंतर पक्षातीलच अंतर्गत गटबाजीमुळे पाच दिवसांतच चौटाला यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं.