Umar Khalid : जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला क्राईम ब्रँचकडून अटक
फेब्रुवारी महिन्यात उत्तर दिल्ली भागात झालेल्या हिंसाचारामध्ये हात असल्याच्या कथित आरोपावरुन उमर खालिदला क्राईम ब्रॅंचने अटक केली आहे. (Umar Khalid arrested by crime branch )
नवी दिल्ली- जेएनयुचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचने अटक केली आहे. उमर खालिदला फेब्रुवारी महिन्यात उत्तरपूर्व दिल्लीत झालेल्या दंगलीशी कथित संबंध असल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. उमरला तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्याचे ट्विट एएनआय वृत्तसंस्थेने केले आहे.
Former JNU student Umar Khalid (in file pic) has been arrested by the Crime Branch in connection with his alleged role in the violence of Northeast Delhi. He has been remanded to 3-day custody. pic.twitter.com/mIbum9sgkS
— ANI (@ANI) October 1, 2020
फेब्रुवारी महिन्यात उत्तरपूर्व दिल्लीत हिंसाचार झाला होता. उमर खालिदला त्या दंगली प्रकरणी UAPA कायद्यांतर्गत 13 सप्टेंबरला अटक करण्यात आली होती. अटकेनंतर उमरला 10 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. दिल्ली विशेष न्यायालयाने पोलीस कोठडीनंतर उमरला 22 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली होती.
दिल्ली पोलिसांनी उमर खालिद विरोधात 6 मार्चला चार्जशीट दाखल केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावेळी नागरिकांनी रस्त्यावर येऊन रास्ता रोको करण्याचे आवाहन उमर खालिदने केले होते. त्यावेळी उमरने दोन ठिकाणी प्रक्षोभक भाषण केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
उमरच्या वकिलांनी 24 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत पोलीस कोठडी दरम्यान उमर खालिदने कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी केली नसल्याचे सांगितले होते. तसेच तिहार तुरुंगात जाण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची परवानगी देण्यात यावी,अशी मागणी न्यायालयात केली होती.
संबंधित बातम्या:
दिल्ली हिंसाचारावर विरोधी पक्ष आक्रमक, लोकसभेत गदारोळ
दिल्ली हिंसाचार पूर्वनियोजित, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप