‘मरण्यासाठी तयार रहा!’, कुमारस्वामी, सिद्धरामय्या यांच्यासह तब्बल 64 जणांना जीवे मारण्याची धमकी

धमकीचे मेसेज आल्यानंतर कुमारस्वामी यांनी सरकारला आवाहन केलंय. अशा धमक्यांना हलक्यात घेऊ नका, असं कुमारस्वामी म्हणालेत. तसंच सरकार विरोधात भूमिका मांडणाऱ्या साहित्यिकांना सुरक्षा पुरवण्याची मागणीही त्यांनी केलीय.

'मरण्यासाठी तयार रहा!', कुमारस्वामी, सिद्धरामय्या यांच्यासह तब्बल 64 जणांना जीवे मारण्याची धमकी
सिद्धरामय्या, कुमारस्वामीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 5:10 PM

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्तरावरुन एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे. कर्नाटकमधील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या (Siddharamayya), माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी (KumarSwami) आणि प्रसिद्ध साहित्यिक के. वीरभद्रप्पा यांच्यासह 64 जणांना जीवे मारण्याची धमकी (Death threats) देण्यात आलीय. तसे मेसेज त्यांना आले आहेत. सोशल मीडियावर हे मेसेज व्हायरल होत आहेत. या प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेता कर्नाटक पोलिसांकडून त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्याचा विचार सुरु आहे. धमकीचे मेसेज आल्यानंतर कुमारस्वामी यांनी सरकारला आवाहन केलंय. अशा धमक्यांना हलक्यात घेऊ नका, असं कुमारस्वामी म्हणालेत. तसंच सरकार विरोधात भूमिका मांडणाऱ्या साहित्यिकांना सुरक्षा पुरवण्याची मागणीही त्यांनी केलीय.

‘तुमच्या आजुबाजूला मृत्यू लपलाय. मरण्यासाठी तयार राहा. तुम्ही विनाशाच्या वाटेवर आहात. मृत्यू तुमच्या अगदी जवळ आहे. तुम्ही तयार राहा. मृत्यू तुम्हाला कोणत्याही रुपात मारु शकतो. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कळवा आणि तुमच्या अंत्यसंस्काराची तयारी करा’, अशा शब्दात कुमारस्वामी, सिद्धरामय्या यांच्यासह 64 जणांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. महत्वाची बाब म्हणजे हा धमकीचा मेसेज पाठवणाऱ्यांनी स्वत:ला सहिष्णू हिंदू म्हटलं आहे.

साहित्यिकांनाही सुरक्षा पुरवण्याची मागणी

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सरकारने अशा प्रकारच्या धमक्यांना हलक्यात घेऊ नका, असं म्हटलंय. त्याचबरोबर सत्ताधारी भाजपपासून प्रगतिशील विचारवंत आणि लेखक के. वीरभद्रप्पा आणि राज्यातील सांप्रदायिक ध्रुवीकरणावर सरकारच्या मौनाला विरोध करणाऱ्या अन्य साहित्यिकांनाही सुरक्षा पुरवण्याची मागणी केलीय.

भाजपकडून अशांतता पसरवण्याचा प्रयत्न, विरोधकांचा आरोप

राज्यात विकासाने एकप्रकारची चिंता निर्माण केल्याचं लेखक प्रा. एम.एम. यांनी म्हटलंय. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हिजाबचा वाद आणि मुस्लिम संघटनांच्या विरोधानंतर हिंदू संघटनांनी मंदिरांमध्ये मुस्लिम व्यापारी, सामान्य व्यापारी आणि अगदी वाहनचालक आणि वाहतूक कंपन्यांनी बनवलेल्या मूर्तींवर बंदी घालण्याची विनंती केलीय. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि जेडीएसने सत्ताधारी भाजप जबाबदार असल्याचं म्हटलंय. भाजपकडून समाजात अशांतता निर्माण करण्यासाठी हिंदू संघटनांना मदत आणि प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय.

इतर बातम्या : 

Political Crisis in Pakistan : इम्रान खान यांच्या ‘किस्मत का फैसला’ रात्री होणार; अविश्वास ठरावावर रात्री 8 वाजता मतदान

Pravin Darekar : सोमय्यानंतर प्रवीण दरेकरांनाही पोलिसांची नोटीस, मुंबै बँक प्रकरणात पुन्हा चौकशी होणार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.