…अन्यथा मला कर्नाटकात यावं लागेल, या नेत्याने कर्नाटक सरकारला थेट इशाराच दिला

| Updated on: Dec 07, 2022 | 12:41 AM

संभाजीराजे यांनी या तोडफोडीचा निषेध व्यक्त केला आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत महाराष्ट्रातही त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.

...अन्यथा मला कर्नाटकात यावं लागेल, या नेत्याने कर्नाटक सरकारला थेट इशाराच दिला
Image Credit source: tv 9 Marathi
Follow us on

मुंबईः महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांची तोडफोड कन्नडिग्गांनी केल्यानंतर आता राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. सीमाभागात असणाऱ्या मराठी भाषिकांना कोणाताही त्रास होऊ नये यासाठी आता राजकीय पक्षांसह राजकीय नेत्यांनी परखड भूमिका घेण्यास प्रारंभ केला आहे. हा वाद मिठत नसेल तर मला कर्नाटकात यावं लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी कर्नाटकला सुनावल होतं. त्यानंतर आता माजी खासदार संभाजीराजे यांनीही ट्विट करत कर्नाटक सरकारला थेट इशाराच दिला आहे.

 

दरवर्षी सौंदत्ती यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक कर्नाटकात जात असतात. त्यामुळे सध्या काही रेणुकादेवीचे भाविक कर्नाटकात गेले आहेत.

त्यातच महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावादावरून वातावरण प्रचंड तापले आहे. त्यामुळे माजी खासदार संभाजीराजे यांनी ट्विट केले आहे.

कारण महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या आणि ज्या वाहनांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आहे. ती वाहनं कन्नडिग्गांनी फोडली आहेत.

त्यामुळे संभाजीराजे यांनी या तोडफोडीचा निषेध व्यक्त केला आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत महाराष्ट्रातही त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.

तर दुसरीकडे सध्या रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरासह महाराष्ट्रातील अनेक भागातील लाखो भाविक सौंदत्ती येथे दर्शनासाठी गेले आहेत.

त्यामुळे त्यांची सुरक्षा ही कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल असा इशारा त्यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.

&nbsp