नागपूरः काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेत सहभागी झालेले महाराष्ट्राचे माजी मंत्री जखमी झाले आहेत. राहुल गांधी यांची पदयात्रा सध्या हैदराबादेत आहेत. राहुल गांधी यांच्यासह यात्रेतील नेते आणि कार्यकर्ते वेगाने चालत असतात. याच धावपळीत माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) अडखळले. ते खाली पडले. या घटनेत त्यांच्या कपाळाला जखमही झाली. तसेच पायाला थोडा मुका मार लागला आहे.
नितीन राऊत पडल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना तत्काळ जवळच्याच रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. नितीन राऊत यांची प्रकृती सध्या ठीक आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या हैदराबादेत आहे. काल राहुल गांधी यांनी रोहित वेमुला यांच्या आईची भेट घेतली. 2016 मध्ये आत्महत्या करणारा दलित विद्यार्थी रोहित वेमुलावरून त्यावेळी वातावरण चांगलंच तापलं होतं. रोहित वेमुला म्हणजे सामाजिक भेदभाव आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचं प्रतीक आहे, असं ट्विट राहुल गांधींनी केलं.
रोहित वेमुलाची आई भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यामुळे नवं धैर्य मिळाल्याचंही राहुल गांधी यांनी सांगितलं.
सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या देशात दोन प्रकारच्या विचारधारा काम करत आहेत.
पहिली विचारधार देशाचे तुकडे करण्यावर भर देत आहे. द्वेषाची बीजं पेरत आहे. तर दुसरी विचारधार देश एकजूट करण्यावर काम करत आहे. भाजपाच्या या विचारधारेशी लढणं दोन मिनिटांचं काम नाहिये. पण भारत जोडो यात्रा ही त्या दिशेने टाकलेलं मजबूत पाऊल आहे, असं वक्त्व्य राहुल गांधी यांनी केलं.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी तमिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरु झाली. आतापर्यंत तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांतून ही यात्रा झाली. या संपूर्ण यात्रेत राहुल गांधी 3750 किमीचा प्रवास करत आहेत. एकूण १२ राज्यांतून ही यात्रा जातेय.
महाराष्ट्रात येत्या 7 नोव्हेंबर रोजी ही यात्रा येईल. नांदेड जिल्ह्यात राहुल गांधी २ दिवस सभा, बैठका, भेटी-गाठी घेतील, अशी माहिती काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाम यांनी दिली.