व्हीडीओ पाहून आपण माणूस आहोत, याची आपल्याला लाज वाटेल, कुणी कट्टर शत्रूशीही असं वागत नाही

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या व्हीडिओत नक्की काय?

व्हीडीओ पाहून आपण माणूस आहोत, याची आपल्याला लाज वाटेल, कुणी कट्टर शत्रूशीही असं वागत नाही
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 8:13 PM

Viral Video | दिवसेंदिवस सामाजिक वातावरण हे गढूळ होत चाललंय. कधी दंगली उसळतायेत. कधी धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. धर्मा-धर्मात तेढ वाढवून सामाजिक विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. आपल्या अवतीभोवती होणाऱ्या या अशा घटनांमुळे आपण कोणत्या समाजात राहतोय, आपण माणूस म्हणवण्याच्या लायकीचे राहिलोत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. समाजातील स्थिती पाहता वातावरण अत्यंत दूषित झालंय.

समाजात आपल्या डोळ्यांसमोर अनेक घटना होताना दिसतात. कुठे तरुणींवर अत्याचार होतायेत. तर कुठं दिनदुबळ्यांवर अन्याय होतोय. मात्र आपण अशावेळी आपल्यासमोर होणाऱ्या चुकीच्या घटनांचं विरोध करण्याऐवजी सपशेल दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपलं कुणी काही वाकडं करु शकत नाही, हा समाजकंटकांचा विश्वास आणखी वाढत जातो. नागरिक म्हणून आपण केलेल्या या दुर्लक्षामुळे हे समाजकंटकांना आणखी बळ मिळतं.

दररोज आपल्या अवतीभोवती अनेक संतापजनक घटना घडतात. काही घटना समोर येतात. तर काही घटनांबद्दल आपल्यापर्यंत पोहचतही नाहीत. मात्र आता सोशल मीडियामुळे काहीच लपवून ठेवता येत नाही. सोशल मीडियामुळे अनेक घटना या उघडकीस आल्या आहेत. सोशल मीडियावर एक संतापजनक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हीडिओ पाहून तुमच्या तळपायाची आग डोक्यात गेल्याशिवाय राहणार नाही. एका मद्यधुंद विकृताने आदिवासी तरुणावर लघवी केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

हा विकृत आधी भाजपच्या माजी आमदाराचा प्रतिनिधी होता. तसेच तो आता भाजप कार्यकर्ता असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र या घटनेनंतर या तरुणाचा आणि भाजपचा काहीही संबंध नसल्याचं पक्षाकडून म्हटलं जात आहे या विकृताचं नाव प्रवेश शुक्ला आहे. या सर्व प्रकारामुळे विरोधकांकडून भाजपवर सडकून टीका केली जात आहे.

व्हायरल व्हीडिओत नक्की काय?

दारुच्या नशेत झिंगलेला हा विकृत पायऱ्यांवर बसलेल्या तरुणावर लघवी करतोय. हा व्हीडिओ एका पत्रकाराने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हीडिओ पाहून अनेकांना आपला संताप अनावर झालाय. हा व्हीडिओ पाहून नेटकऱ्यांनी या विकृतावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय. “कु्त्रा पण असं करत नाही”, अशी प्रतिक्रिया एका नेटऱ्यांनी दिलीय. तर “आपल्यातली माणूसकी मेलीय”,असं एकाने म्हटलंय. मात्र हा व्हीडिओ काही दिवसांपूर्वीचा असल्याचं म्हटलं जात आहे.

व्हायरल व्हीडिओ

हा सर्व संतापजनक प्रकार मध्य प्रदेश राज्यातील सीधी जिल्ह्यातील कुबरी इथला आहे. या कुबरी बाजारात हा तरुण बसलेला. दारुच्या नशेत असलेला हा प्रवेश शुक्ला तिथे आला. तिथे बसलेल्या या तरुणावर लघवी केली. तेव्हाच तिथे असलेल्या एकाने हा व्हीडिओ शूट केला. त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला.

दरम्यान या घटनेची दखल मु्ख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतलीय. यानंतर या विकृताला पोलिसांनी अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. आता या विकृतावर नक्की काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.