असा अर्थमंत्री पुन्हा होणे नाही, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा अल्पपरिचय

मनमोहन सिंह यांनी 1991 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना उदारीकरणाचा घेतला निर्णय ऐतिहासिक ठरला. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेलं. मनमोहन सिंह यांच्या उदारीकरणाच्या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट केलं.

असा अर्थमंत्री पुन्हा होणे नाही, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा अल्पपरिचय
manmohan singh
Follow us
| Updated on: Dec 27, 2024 | 12:15 AM

PM Manmohan Singh Death : भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं आज (26 डिसेंबर) निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंह यांनी देशाला यशाच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. मनमोहन सिंह यांनी 1991 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना उदारीकरणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक ठरला. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्था एका वेगळ्या उंचीवर गेली. मनमोहन सिंह यांच्या उदारीकरणाच्या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट केलं.

डॉ. मनमोहन सिंह यांचा अल्प परिचय

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वळणाचे जनक म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांना ओळखले जाते. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताचे 14 वे पंतप्रधान होते. डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत आणि अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा कामाप्रती असलेला शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता आणि विनम्र आचरणामुळे ते कायमच चर्चेत असायचे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला. डॉ. मनमोहन सिंग यांनी 1948 साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1957 साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली. यानंतर 1962 साली डॉ. मनमोहन सिंग यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फील संपादन केली.

डॉ. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकोनोमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. या काळात त्यांनी  युएनसीटीएडी सचिवालयात काही काळ काम केले. यानंतर 1987 आणि 1990 या काळात त्यांची जीनिव्हा येथील साऊथ कमिशनच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. डॉ. मनमोहन सिंग यांनी 1971 साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली. यानंतर 1972 साली डॉ. मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली.

डॉ. मनमोहन सिंग यांनी भूषवली अनेक महत्त्वाची पदे

डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्रालयात अनेक महत्वाची पद भूषवली. यात अर्थ मंत्रालयाचे सचिवपद , नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, रिझर्व बँकेचे गव्हर्नरपद, पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद या पदांचा समावेश होता. यानंतर 1991-1996 या पाच वर्षांच्या काळात ते भारताचे अर्थमंत्री होते. हा काळ स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड मानला जातो. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या आर्थिक सुधारणा अमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले धोरण तयार केले.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले. डॉ. मनमोहन सिंग यांना 1987 या काळात भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. त्यानंतर भारतीय विज्ञान कॉंग्रेस मध्ये देण्यात येणारा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी सन्मान(1995), अर्थमंत्र्यांसाठी दिला जाणारा आशिया मनी अवार्ड (1993 आणि 1994), केम्ब्रिज विद्यापीठाचा अ‍ॅडम स्मिथ पुरस्कार (1956), केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्कार असे काही विशेष पुरस्कार मिळाले.

अनेक विशेष पुरस्काराने सन्मानित

याशिवाय जपान निहोन कायझाई शिम्बूनसारख्या अनेक संस्थांनी डॉ. मनमोहन सिंग यांना सन्मानित करण्यात आले. केम्ब्रिज आणि ऑक्सफोर्डसारख्या अनेक विद्यापीठांकडून डॉ मनमोहन सिंग यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. मनमोहन सिंग यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी 1993 मध्ये सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीत आणि व्हिएन्ना येथे मानवाधिकारावरील जागतिक परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले.

मनमोहन सिंह यांनी 2004 ते 2009 असे दोन वेळा भारताचे पंतप्रधान पद भूषवले. लोकसभेची निवडणूक न जिंकणारे आणि राज्यसभेचे सदस्य असताना हे पद भूषविणारे ते पहिले पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात आर्थिक विकास आणि सामाजिक नियोजनावर विशेष भर देण्यात आला.

देशभरात शोककळा

डॉ. मनमोहन सिंग यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली असा परिवार आहे. साहित्य, संगीत आणि अध्यात्मात त्यांना प्रचंड रस होता. मनमोहन सिंह यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरात शोककळा पसरली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.