Dr. Manmohan Singh Passes Away LIVE : मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी 10 वाजता होणार अंत्यसंस्कार
Dr. Manmohan Singh Passes Away LIVE : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे आज (२७ डिसेंबर) आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
कल्याण आमदाराचे बॅनर फाडले
कल्याण पूर्व आनंदवाडी येथील भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या अभिनंदनासाठी लावण्यात आलेल्या बॅनरला दोन अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आला आहे.
-
परळी हवेत गोळीबार प्रकरणातील आरोपीस जामीन
परळी हवेत गोळीबार प्रकरणातील आरोपी कैलास फड याला परळी कोर्टाने जामीन आहे. 50 हजारांच्या जात मुचलक्यावर कोर्टाने जमीन मंजूर केला आहे.
-
-
अखिलेश शुक्ला याची पोलीस कोठडी आज संपणार
कल्याण मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणात आरोपी अखिलेश शुक्ला त्याची पत्नी गीता शुक्लासह इतर चार आरोपीची पोलीस कोठडी आज संपणार आहे. या सहा आरोपींना खडकपाडा पोलीस आता कल्याण न्यायालयात हजर करणार आहेत. त्यांना आता पोलीस कोठडी होणार की न्यायालयीन कोठडी याकडे लागले सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
-
साई चरणी सोन्याचा मुकूट दान
साईबाबांवर देश – विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. इंदूर येथील जुगल जैस्वाल या साईभक्ताने साईचरणी देणगी स्वरुपात 200 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट साईंच्या चरणी अर्पण केला आहे.
-
ट्रॅकमनच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचे वाचले प्राण
जळगाव रेल्वे स्थानकावर ट्रॅकमनच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचे प्राण वाचले आहे. धावती रेल्वे पकडण्याचा प्रयत्नात पाय घसरल्याने फरपटात जाणाऱ्या प्रवाशाला ट्रॅकमनने वेळीच बाहेर ओढल्याने प्रवाशाचे प्राण वाचले.
-
-
विष्णू चाटे याची कसून चौकशी
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या चारही आरोपीची सीआयडी पथकाकडून कसून चौकशी सुरू आहे. यातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याची तब्बल एक तासाहून जास्त चौकशी करण्यात आली. विष्णू चाटे आला चौकशीकामी सीआयडी पथक घटनास्थळी घेऊन गेले आहेत.
-
मुख्यमंत्री कार्यक्रमासाठी ठाण्यात
ठाण्यात प्रथमच होणाऱ्या “गृहनिर्माण संस्थाच्या महाअधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचा संयुक्त उपक्रम असलेले हे अधिवेशन २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत ठाण्यातील उपवन परिसरातील मैदानात होणार आहे.
-
-
सीआयडीचे तीन अधिकारी परळीत
सीआयडीचे तीन अधिकारी परळी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. एक महिला आणि दोन पुरुष अधिकारी परळी पोलीस ठाण्यात आले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात सीआयडी तपास करत आहे.
-
अमोल मिटकरी यांच्यावर धसांची शेलक्या भाषेत टीका
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांच्यावर भाजपा आमदार सुरेश धस यांनी शेलक्या भाषेत टीका केली. त्यांनी मिटकरी हे लहान असल्याचे म्हटले.
-
रवींद्र चव्हाण सहकुटुंब अंबाबाईच्या दर्शनाला
माजी बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी सहकुटुंब कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतलं. महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर जनतेची सेवा करायला सरकार स्थापन झालं आहे. पक्ष जबाबदारी देईल ती अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडेन, असे ते म्हणाले.
-
कुणाचं छत्र हिरावू नये -वैभवी देशमुख
माझ्या वडिलांसोबत काय झालं, हे तुम्हा सर्वांना माहित आहे. त्यांची क्रूर हत्या झाली. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही सर्व मोठ्या संख्येने आलात तसेच कायम आमच्यासोबत राहा. आज आमचं छत्र हिरावलं आहे, दुसऱ्या कुठल्या मुला-मुलीसोबत असं होऊ नये, आज आमच्या कुटुंबावर जी वेळ आली, तशी वेळ पुन्हा कुठल्या कुटुंबावर येऊ नये असे वक्तव्य संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने केले आहे.
-
छगन भुजबळांना बाजूला ठेवणं कुणालाही परवडणारे नाही
छगन भुजबळांना बाजूला ठेवणं कुणालाही परवडणारे नाही. छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार नाही, अजित दादांसोबतच राहतील, असे वक्तव्य नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.
-
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार नाही – नरहरी झिरवाळ
आदिवासी भागातील वैदू आणि औषधी वनस्पतींना आयुर्वेदाशी सांगड घालून मुख्य प्रवाहात आणणार. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती. “छगन भुजबळांना बाजूला ठेवणं कुणालाही परवडणारे नाही. छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार नाही, अजित दादांसोबतच राहतील” नरहरी झिरवाळ यांना विश्वास
-
7 लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याच आत्मसमर्पण
7 लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याच गोंदिया पोलीस दलासमोर आत्मसमर्पण. अर्जुन मुडाम याचा छत्तीसगड आणि महाराष्ट्र सीमेवर घडलेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये होता समावेश. माओवादी संघटनेमध्ये होणारा त्रास व अत्याचाराला कंटाळून त्याने गोंदिया पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. देवा ऊर्फ अर्जुन ऊर्फ राकेश सुमडो मुडाम (27) असे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचे नाव..
-
हा मराठा समाजाला मारून दहशत बसवण्याचा प्रयत्न – मराठा आंदोलक
“दिल्लीत रक्त सांडले, तरी मराठा त्यांच्या मदतीला गेला. दत्ताजी शिंदे हे दिल्लीच्या बादशहाच्या संरक्षणासाठी गेले होते. हातात शस्त्र घेऊन दिल्लीला मराठा बांधव गेला आणि पानिपत घडले. त्याप्रमाणे संतोष देशमुख यांना ज्यांनी मारले, त्यांना फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी केवळ संतोष देशमुखच नव्हे तर संपूर्ण मराठा समाजाला मारून समाजावर दहशत बसवण्याचा प्रयत्न केला आहे” असं मराठा आंदोलक सुधाकर माने म्हणाले.
-
भारताच्या मोठ्या शत्रुचा पाकिस्तानात मृत्यू
भारताच्या मोठ्या शत्रुचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे. वाँटेड दहशतवादी हाफिज अब्दुल रहमान मक्कीचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे. तो लश्कर-ए-तैयबाचा (LeT) डेप्युटी चीफ आणि हाफिज मोहम्मद सईदचा नातेवाईक होता.
-
मनमोहन सिंग यांचं देशासाठी योगदान श्रेष्ठ – दीपक केसरकर
मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना त्यांनी केलेली कामे ही कायम स्मरणात राहतील देशासाठी त्यांचं योगदान हे श्रेष्ठ आहे असं आमदार दीपक केसरकर म्हणाले. संजय राऊतांसाठी त्यांचं सरकार आलं तर काम चांगलं होतं. कायदा-सुव्यवस्था अबाधित राहते, त्याचं सरकार आलं नाही की मग आमचं सरकार वाईट, ही दुटप्पी भूमिका अशी टीका दीपक केसरकर यांनी केली.
-
आज आमच्यावर जी वेळ आली ती कोणावर येऊ नये- वैभवी देशमुख
“माझ्या वडिलांची हत्या झाल्यानंतर आपण एकत्रित आलात ते असेच राहो. आज आमच्यावर जी वेळ आली ती कोणावर येऊ नये. माझे वडील समाजसेवक होते, त्यांनी आमच्याकडे कधीही लक्ष दिले नाही. रेणापूर हे माझे आजोळ आहे त्यामुळे तुम्ही माझ्या पाठीशी राहा. आज ज्याप्रमाणे आलात त्याप्रमाणे प्रत्येक मोर्चात सहभागी व्हा. माझे वडील आमच्यातून गेलेत पण तुम्ही आमच्या पाठीशी राहा,” असं संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख म्हणाल्या.
-
संजय राऊतांचा सकाळचा भोंगा बंद केला पाहिजे, असं आता लोकंच सांगतायत- चाकणकर
‘संजय राऊतांचा सकाळचा भोंगा बंद केला पाहिजे, असं आता लोकंच सांगत आहेत. विधानसभा निवडणुकीत एवढा मोठा पराभव झाला. विरोधी पक्षनेता देखील देता आला नाही, हे दुर्दैव आहे. त्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,’ असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
-
सतत असलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईकरांचा व्हेकेशन मोड ऑन
सतत असलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईकरांचा व्हेकेशन मोड सध्या ऑन झालेला आहे. नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी मुंबईकरांची गोव्याला पहिली पसंती आहे. गोव्याला, मालवणला आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकरांनी एअरपोर्टच्या दिशेने धाव घेतली आहे. डिपार्चर १ आणि डिपार्चर २ या दोन्ही ठिकाणी रांगा बाहेरपर्यंत लागलेल्या आहेत तर चेकइनसाठी २ ते ३ तासांचा वेळ लागतोय.
-
राजगुरुनगरमध्ये दोन चिमुकल्या मुलींच्या अत्याचार प्रकरणी आंदोलकांनी पुणे – नाशिक महामार्ग रोखला
राजगुरूनगर/पुणे- राजगुरुनगरमध्ये दोन चिमुकल्या मुलींच्या अत्याचार प्रकरणी आंदोलकांनी पुणे – नाशिक महामार्ग रोखला आहे. आंदोलकांमध्येच दोन गट पडले असून एका गटाकडून रास्ता रोको करण्यासाठी विरोध केला जातोय. तर शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा एका गटाचा निर्णय आहे.
-
नवी दिल्ली – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना भारतरत्न द्या, अशी मागणी
नवी दिल्ली – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना भारतरत्न द्या, अशी मागणी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास नवी दिल्लीतल्या ‘एम्स’ रुग्णालयात निधन झालं. ते 92 वर्षांचे होते.
-
लातूर – रेणापूर इथं आक्रोश मोर्चाला सुरुवात
लातूर – रेणापूर इथं आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली असून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य सूत्रधाराला अटक करण्याच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला.
-
माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले, “डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन हा देशासाठी फक्त धक्काच नाही तर माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान आहे. माझ्या जवळचे स्नेही होते. ते सभ्यतेचे उदाहरण होते. ते भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकार होते. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो…”
#WATCH | On the demise of former PM Dr Manmohan Singh, Former President Ram Nath Kovind says, ” The passing of Dr Manmohan Singh, is not just a setback for the nation but also a personal loss for me. I have known him for so long…he was an example of politeness…I believe that… pic.twitter.com/oOZje1NvtF
— ANI (@ANI) December 27, 2024
-
संजय सिंह यांनी मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्याची केली मागणी
आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.
-
सोनिया-राहुल-प्रियांका यांनी वाहिली अखेरची श्रद्धांजली
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
#WATCH | Delhi | LoP Lok Sabha and Congress MP Rahul Gandhi pays last respects to former PM Dr Manmohan Singh
(Video source: Congress) pic.twitter.com/OaBmvy0TRE
— ANI (@ANI) December 27, 2024
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने आपण सर्वांनाच दु:ख झाले आहे. त्यांचे जाणे संपूर्ण देशाला मोठा धक्का आहे. त्यांचे जीवन भावी पिढ्यांसाठी एक उदाहरण आहे. एक प्रामाणिक व्यक्ती, एक महान अर्थशास्त्रज्ञ आणि एक नेता म्हणून स्मरणात राहतील. एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी आव्हानात्मक काळात आरबीआय गव्हर्नर म्हणून काम केले . ते माजी पंतप्रधान भारतरत्न पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असताना आर्थिक संकटात अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एक नवी दिशा दिली.”
#WATCH | On the demise of former PM Dr Manmohan Singh, PM Modi says, ” We all have deeply saddened by the demise of former PM Dr Manmohan Singh. His passing is a setback to the whole nation…his life is an example for future generations regarding how we can rise above struggles… pic.twitter.com/MhgtXg3OK0
— ANI (@ANI) December 27, 2024
-
मनमोहन सिंग यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या (शनिवारी) सकाळी 10-11 वाजता दिल्लीतील शक्तीस्थळाजवळ विशेष प्रोटोकॉलसह अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांची मुलगी आज रात्री उशिरा अमेरिकेहून दिल्लीला पोहोचेल. सध्या डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. काल रात्री एम्समधून त्यांचे पार्थिव येथे आणण्यात आले, जिथे त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.
-
कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात न्यायासाठी भाजपचे अध्यक्षांनी स्वत:ला मारले चाबकाचे फटके
कोईम्बतूर : अण्णा विद्यापीठातील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात न्याय मागण्यासाठी तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई यांनी निषेध म्हणून स्वत:ला चाबकाचे फटके मारले.
#WATCH | Coimbatore | Tamil Nadu BJP president K Annamalai self-whips himself as a mark of protest to demand justice in the Anna University alleged sexual assault case. pic.twitter.com/ZoEhSsoo1r
— ANI (@ANI) December 27, 2024
-
पुण्यातील राजगुरूनगर प्रकरण – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची पोलीस अधीक्षकांसोबत बैठक
पुण्यातील राजगुरूनगर मध्ये दोन चिमुकल्या मुलींची हत्या झाली होती. याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासोबत बैठक सुरू आहे.
बुधवारी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर मध्ये दोन चिमुकल्या बहिणींवर अतिप्रसंग करत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अजय दास या आरोपीला अटक केली आहे.
-
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण – आरोपी बसचालकाचा परवाना 3 महिन्यांसाठी रद्द
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील आरोपी बसचालका, संजय मोरेचा परवाना 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आल्याचे आरटीओकडून जाहीर.
मोरे यांनी 9 डिसेंबर रोजी गर्दीच्या वेळी कुर्ला रस्त्यावर अनेक पादचारी आणि वाहनांवर बेस्टची बस धडक दिली होती, त्यामध्ये 9 ठार आणि 40 जण जखमी झाले.
ही एक अनुचित घटना आहे आणि मोरे यांच्यावर आजीवन वाहन चालवण्यास बंदी घालण्याचा विचार करत असून, यासंदर्भात काही दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल असे सह परिवहन आयुक्त रवी गायकवाड यांनी सांगितलं.
-
डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन ही देशाची हानी – संजय राऊत यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन ही देशाची हानी आहे. सध्याच्या सरकारने एवढे सुरुंग लावले तरी आपली अर्थव्यवस्था टिकून आहे याचे सर्व श्रेय डॉक्टर मनमोहन सिंग यांना जातं, असे म्हणत संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.
आज नरेंद्र मोदी हे फुकट धान्य देत आहेत. कोणीही उपाशी राहणार नाही, प्रत्येकाच्या घरात चूल पेटते ही योजना मनमोहन सिंग यांची आहे. अन्नसुरक्षा कायदा त्यांनी आणला, अशा अनेक योजना त्यांनी देशातील जनतेसाठी आणल्या, असेही राऊत म्हणाले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे अंत्यदर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे अंत्यदर्शन घेतले.
#WATCH | Delhi | PM Narendra Modi pays last respects to late former PM Dr Manmohan Singh and offers condolences to his family pic.twitter.com/7vn1PB1Xdj
— ANI (@ANI) December 27, 2024
-
पुणे – हडपसर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची काँग्रेसची मागणी
पुणे शहरातील हडपसर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची काँग्रेसची मागणी.
समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सहा अर्धवट पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी करत मोहन जोशी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतली .
महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.
-
PM Manmohan Singh Death : दिग्गज अर्थतज्ज्ञ हरपला, देशभरातून हळहळ व्यक्त
PM Manmohan Singh Death : संकटात असलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देणारा दिग्गज अर्थतज्ज्ञ हरपला, देशभरातून हळहळ व्यक्तhttps://t.co/tp5B40LN74 #PMManmohanSingh
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 26, 2024
-
मनमोहन सिंग यांची राजकीय कारकीर्द
असा अर्थमंत्री पुन्हा होणे नाही, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा अल्पपरिचयhttps://t.co/orRxOkRyBW #ManmohanSingh
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 26, 2024
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली
देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अतीव दु:खदायक आहे. आधी केंद्रीय वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पाऊले उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचे नवे दालन खुले करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची… pic.twitter.com/ulc8yITrE0
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 26, 2024
-
डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन, संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल (२६ डिसेंबर) निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
-
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार, 7 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच आज सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.
Centre has announced a seven-day state mourning across the country from December 26, 2024, to January 1, 2025 following the demise of former Prime Minister Manmohan Singh on December 26, 2024, at AIIMS Hospital in New Delhi. During this time, the National Flag will be flown at… pic.twitter.com/QbceIELT1M
— ANI (@ANI) December 27, 2024
भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. दिल्ल्तील एम्स रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे आज (२७ डिसेंबर) आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम अर्थतज्ज्ञ अशी मनमोहन सिंग यांची ख्याती होती. देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले ते पहिले शीख पंतप्रधान होते. २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहिलं. अर्थतज्ज्ञ ते पंतप्रधान असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे.
Published On - Dec 27,2024 8:44 AM