कृष्णानगरचं क्लिनिक माझी वाट पाहतंय…तिकीट कापताच भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा राजकारणालाच रामराम

भाजपाने देशातील लोकसभेच्या आपली पहिली उमेदवार यादी शनिवारी जाहीर केली. या यादीत अनेक जणांचे तिकीट कापले आहे. त्यामुळे अनेक जण नाराज झाले आहेत. यातील काही जणांनी तर उमेदवार यादी येण्याआधीच राजकारणाला सोडचिट्टी देत असल्याचे जाहीर केले होते. त्यात आता आणखी एक नाव जोडले गेले आहेत.

कृष्णानगरचं क्लिनिक माझी वाट पाहतंय...तिकीट कापताच भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा राजकारणालाच रामराम
Dr. HarshvardhanImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 03, 2024 | 5:09 PM

दिल्ली | 3 मार्च 2024 : भाजपाने आपली लोकसभेसाठीची पहिली 195 उमेदवारांची यादी काल जारी केली. या यादीत अनेक खासदारांना डच्चू देण्यात आला. त्यामुळे आता नाराज झालेल्यांच्या प्रतिक्रीया समोर येत आहेत. क्रिकेट स्टार गौतम गंभीर आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचे पूत्र जयंत सिन्हा यांनी तर यादी जाहीर होण्याची वाट न पाहताच आपला राजकिय संन्यास जाहीर केला. तर दिल्लीचे नेते डॉ. हर्षवर्धन यांनी आपण सक्रीय राजकारणातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. भाजपाने शनिवारी जारी केलेल्या यादीत डॉ. हर्षवर्धन यांच्या जागी प्रवीण खंडेलवाल यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे हर्षवर्धन यांनी ‘एक्स’ वर पोस्ट टाकत आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.

दिल्लीच्या चांदणी चौक मतदार संघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले खासदार हर्षवर्धन यांचे नाव पहिल्या यादीत नाही. त्यांच्या ऐवजी प्रवीण खंडेलवाल यांना भाजपाने यंदा तिकीट दिले आहे. त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला आहे. हर्षवर्धन यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून काम पाहीले आहे. हर्षवर्धन यांनी एक्सवर पोस्ट लिहीली आहे. त्यात ते म्हणतात की तीस वर्षांहून अधिक शानदार काळात आपल्या निवडणूक करीयरमध्ये पाच विधानसभा आणि दोन लोकसभा निवडणूका लढलो. ज्या मी मोठ्या फरकाने जिंकलो. आणि पार्टी संघटना, राज्य आणि केंद्र सरकारमध्ये अनेक प्रतिष्ठीत पदांवर काम केले. आता आपल्या मुळ व्यवसायाकडे वळत आहे.

अंत्योदय दर्शनचे तत्व मानतो – हर्षवर्धन

50 वर्षांपूर्वी जेव्हा गरीबांना मदत करण्याच्या उद्देश्याने कानपूरच्या जीएसव्हीएम मेडीकल कॉलेजात प्रवेश केला तेव्हा मानव जातीची सेवा हेच माझे ध्यैय होते. एक स्वयंसेवक म्हणून अंतिम व्यक्तीची सेवा करण्यासाठी मी कायम प्रयत्नरथ राहीलो. मी दीन दयाल उपाध्याय यांच्या अंत्योदय दर्शनला मानणारा आहे. तत्कालीन आरएसएस नेतृत्वाच्या आग्रहामुळे मी राजकारणात आलो. माझ्यासाठी राजकारण म्हणजे गरीबी, आजारपण आणि अज्ञानतेशी लढण्याची संधी म्हणूनच आपण राजकारणात येण्यास तयार झालो असे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

कोविड दरम्यान सेवेची संधी

आपण दिल्लीच्या आरोग्यमंत्री पदा सह दोन वेळा केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून काम केले. आधी पोलिओ मुक्त भारत बनविण्याच्या दिशेने काम करणे नंतर कोविड काळात आपल्याला लाखो देशवासियांची सेवा करण्याची दुर्मिळ संधी मिळाल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. मानवी इतिहासात आपल्या लोकांचे गंभीर संकटात मानवाचे प्राण वाचविण्याचा विशेष अधिकारी केवळ काही जणांना मिळाला आहे. आपण कधीच जबाबदारीपासून दूर पळालो नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतमातेबद्दल माझी कृतज्ञता, माझ्या देशवासियांबद्दलचा आदर आणि आपल्या संविधानात दिलेल्या मूल्यांबद्दलचा मला आदर राहीला आहे. भगवान श्री रामाने मला मानवी जीवन वाचविण्यासाठी सक्षम बनविले हे माझे सौभाग्य असल्याचे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.