Sharad Yadav Died | माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन
माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन झालं आहे. शरद यादव यांनी 75 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. शरद यादव यांची मुलगी शुभाशिनी यादवने माहिती दिली आहे.
मुंबई : राजकीय वर्तुळातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन झालं आहे. शरद यादव यांनी वयाच्या 75 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. शरद यादव यांची गुरुग्राममधील फोर्टीस हॉस्पीटलमध्ये प्राणज्योत माळवली. शरद यादव यांची मुलगी शुभाशिनी यादव यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. शरद यादव यांच्या निधनामुळे राजकीय विश्वावर शोक पसरला आहे. राजकीय विश्वातील दिग्गज व्यक्ती गेल्याने हळहळ व्यक्ती केली जात आहे.
शरद यादव यांचं निधन
Former Union Minister Sharad Yadav passes away, confirms his daughter through a Facebook post. pic.twitter.com/p56lUeqz7B
— ANI (@ANI) January 12, 2023
शरद यादव यांची लेक शुभाशिनीने “बाबा नाही राहिले”, अशी भावूक पोस्ट करत शोक व्यक्त केला. या दिग्गज नेत्याने बिहारच्या राजकारणात गेल्या अनेक दशकात अनेक चढ-उतार पाहिले. बिहारच्या राजकीय घडामोडीत यादव यांचा सक्रीय सहभाग होता.
शरद यादव यांच्याबद्दल थोडक्यात
शरद यादव यांचा जन्म 1947 साली मध्य प्रदेशमधील होशंगाबाद (नर्मदापुरम) इथे झाला होता. यादव यांनी 1971 साली अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. डॉ राममनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला.
राजकारणात प्रवेश
यादव यांनी सक्रीय राजकारणात 1974 साली पदार्पण केलं. यादव पहिल्यांदा मध्य प्रदेशमधील जबलपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले.
तसेच यादव यांनी 1999 आणि 2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये विविध खात्यांची जबाबदारी सार्थपणे पार पाडली. यादव 2003 मध्ये जनता दल युनायटेडचे अध्यक्ष बनले. यादव तब्बल 7 वेळा लोकसभेत निवडून गेले. तर 3 वेळा राज्यसभेतही प्रतिनिधित्व केलं.
दिग्ग्जांकडून शोक व्यक्त
दरम्यान यादव यांच्या निधनाच्या वृत्तानंतर राजकीय विश्वातीन शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केलंय.
पंतप्रधान मोदींचं ट्विट
Pained by the passing away of Shri Sharad Yadav Ji. In his long years in public life, he distinguished himself as MP and Minister. He was greatly inspired by Dr. Lohia’s ideals. I will always cherish our interactions. Condolences to his family and admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) January 12, 2023
“श्री.शरद यादव यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाले. त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक कारकिर्दीत त्यांनी स्वत:ला एक खासदार आणि मंत्री म्हणून ओळख मिळवली. डॉ. लोहिया यांच्या आदर्शांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यांच्या सोबतचा संवाद मी कायम स्मरणात ठेवेन. यादव कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे”, असं ट्विट करत पंतप्रधानांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आणि शोक व्यक्त केला.